शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुनाळेकरने मला दिलेल्या धमकीची चौकशी करावी, डॉ. श्रीपाल सबनीस यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 05:02 IST

सनातनचे वकील संजीव पुनाळेकरने मलाही सकाळी मॉर्निंग वॉकला जा, अशी गर्भित धमकी दिली होती.

पुणे : सनातनचे वकील संजीव पुनाळेकरने मलाही सकाळी मॉर्निंग वॉकला जा, अशी गर्भित धमकी दिली होती. तेव्हा जीवाला धोका आहे, अशी तक्रार मी पोलिसांकडे केली होती. मात्र, पोलिसांनी कोणताही दखलपात्र गुन्हा नोंदविला नाही. पुनाळेकर याला पोलिसांनी अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर या धमकीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी केली.अ‍ॅड. पुनाळेकर कायद्याचा गैरवापर करणारा आणि गुन्हेगारी प्रवृतीचा वकील असण्याची खात्री देशाला त्याच्या पराक्रमातून झालेली आहे. तीन वर्षांपूर्वी अ. भा. मराठी साहित्य संंमेलनाचा अध्यक्ष असताना याच पुनाळेकरने मला टिष्ट्वट करून ‘मॉर्निंग वॉकला चालत जा’ अशी धमकी दिली होती. त्यावेळी राज्य सरकारला लिखित अर्ज केला होता. मात्र. पोलिसांनी दखलपात्र गुन्हा नोंदविला नाही. उलट यात कोणतेही तथ्य नाही म्हणून या व्यक्तीला क्लिन चीट दिली.सीबीआयने दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयने त्याला अटक केली आहे. सनातनमुळे भारतीय संविधानाला धोका आहे. माझ्या प्रकरणात पुनाळेकरची चौकशी करावी अशी मागणी पोलिस आणि सीबीआयकडे करीत आहे, असे सबनीस यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर