शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

खुनाच्या गुन्ह्यातून गज्या मारणेची निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील टोळीचे आर्थिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तसेच पूर्वीच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी पप्पू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील टोळीचे आर्थिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तसेच पूर्वीच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी पप्पू गावडे खून प्रकरणात पौड येथे गुन्हा दाखल असलेल्या गजानन मारणे व अन्य आरोपींची पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

विशेष मोक्का न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी हा निकाल दिला असून पुराव्याअभावी आरोपींची मुक्तता केली असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. सुधीर शहा, अॅड. विजयसिंह ठोंबरे, अॅड. विपुल धुशिंग, अॅड. जितू सावंत, अॅड. विद्याधर कोशे, अॅड. भरेकर यांनी कामकाज पाहिले.

गजानन मारणे (वय ४९), पप्पू ऊर्फ अतुल लक्ष्मण कुडले (वय ३०), रूपेश कृष्णराव मारणे, संतोष विश्वनाथ शेलार, सुनील नामदेव बनसोडे, गणेश नामदेव हुंडारे (वय ३२), प्रदीप दत्तात्रय कंधारे (वय २८), अनंता ज्ञानोबा कदम (वय ३०), बाब्या ऊर्फ श्रीकांत संभाजी पवार (वय २७), बापू श्रीमंत बागल (वय ३०), गोरक्षनाथ तुकाराम हाळंदे (वय ३०), यशवंत ऊर्फ बाळा दासू बोकेफोडे (वय ३०), उमेश नागू टेमधरे, सतीश ऊर्फ आबा शिळीमकर अशी निर्दोष सुटका केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नीलेश ज्ञानेश्वर जाधव यांनी पौड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.

मौजे लवळे गावाच्या हद्दीतील गावडे वस्तीजवळ ३ नोव्हेंबर २०१४ मध्ये जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील टोळीचे आर्थिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तसेच पूर्वीच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी पप्पू ऊर्फ संतोष हिरामण गावडे याचा खून झाला होता. नीलेश घायवळ आणि गजानन मारणे हे दोघे पूर्वीपासून आर्थिक फायद्यासाठी गुन्हेगारी टोळ्या चालवितात. या दोन्ही टोळ्यांमध्ये फार पूर्वीपासून कोथरूड व मुळशी तालुक्यातील जमिनीचे खरेदी-विक्रीचे जुने वाद आहे. या वादातून मारणे व घायवळ यांच्या टोळ्यांनी एकमेकांवर खुनी हल्ले केले आहेत. २००८ मध्ये नीलेश घायवळ व पप्पू ऊर्फ संतोष गावडे यांच्यावर गजानन मारणे, पप्पू कुडले व त्यांच्या साथीदारांनी फायरिंग करून व कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

त्यामध्ये पप्पू गावडे याने दिलेल्या फिर्यादीवरून कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात साक्ष दिली तर तुला संपवून टाकू अशी धमकी त्यांनी पप्पू गावडे याला दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी पप्पूचा काटा काढला. यामध्ये आरोपी श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार याने गुन्ह्यात वापरलेला चाॅपर, कोयता व इतर १ कोयता जप्त करण्यात आला होता. यापूर्वीही अमोल बधेच्या खून प्रकरणातून न्यायालयाने गजानन मारणे याच्यासह २० साथीदारांची निर्दोष मुक्तता केली होती.

.......