पुणे : दिवाळीत फराळासाठी लागणाऱ्या बहुतेक सर्वच वस्तूंचे भाव मागील वर्षीच्या तुलनेत कमालीचे वाढले आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत फराळाला ‘महागाई’ची फोडणी मिळणार असून ग्राहकांना दिवाळी खरेदीसाठी खिसा रिकामा करावा लागेल, अशी स्थिती आहे. वनस्पती तूप, साखर, गूळ, पोहे, बेसन, शेंगदाणा या सर्वच वस्तूंचे भाव सध्या तेजीत आहेत. परिणामी, तयार फराळासाठीही यंदा जादाचे पैसे मोजावे लागतील. दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. बहुतेकांनी दिवाळीची खरेदीही सुरू केली आहे. दिवाळीत मुख्य आकर्षण असते ते फराळाचे. त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. दिवाळीत विविध प्रकारचे लाडू, चिवडा, चकली, करंजी, कापणी, अनारसे, शंकरपाळी, शेव अशा विविध खमंग पदार्थांची रेलचेल असते. त्यासाठी सर्वसामान्य नागरिक आधीपासूनच बजेटची तयारी करतात. पण या वर्षी बहुतेकांचे हे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या बहुतेक वस्तूंचे भाव तेजीत आहेत. त्यामुळे तयार फराळ असो किंवा घरच्या फराळाची मेजवानी दोन्हीसाठी बजेट वाढवावे लागणार आहे. मागील दोन वर्षांत पावसाने पाठ फिरविल्याने हरभऱ्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे मागील वर्षभरापासून हरभऱ्यासह हरभराडाळीचे भावही तेजीत आहेत. यंदा हरभराडाळीने भावाचा उच्चांक गाठला. हरभरा डाळीचे भाव मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहेत. डाळ महागल्याने बेसनाच्या भावानेही मोठी उडी घेतली. भाजकी डाळही तुलनेने चांगलीच महागली आहे. दिवाळीत बेसनाचा वापर लाडू, चकली, शेव या पदार्थांसाठी केला जातो, तर भाजकी डाळ सर्रासपणे चिवड्यामध्ये वापरली जाते. (प्रतिनिधी)गुळाच्या भावात दुप्पट वाढयंदाच्या दिवाळीत फराळाची गोडीही कमी होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत साखर आणि गुळाचे भावही चांगलेच कडाडले आहेत. दोन वर्षांत पावसाअभावी उसाच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, साखर व गुळाचे उत्पादनही मागणीच्या तुलनेत कमी झाले आहे. त्यामुळे दोन्ही वस्तूंचे भाव तेजीत आहेत. साखरेच्या भावात क्विंटलमागे १ हजार रुपये, तर गुळाच्या भावात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. पदार्थ तळण्यासाठी साधारणपणे सूर्यफुल रिफार्इंड तेल व वनस्पती तुपाचा वापर केला जातो. तेलाचे भाव यंदा मागील वर्षी इतकेच आहेत. मात्र, त्याचवेळी वनस्पती तुपाच्या भावात काहीशी वाढ झाली आहे.पोह्याच्या चिवड्यालाही दिवाळीत मोठी मागणी असते. मात्र, कच्च्या मालाची आवक कमी होत असल्याने पोह्याचे भावही तेजीत आहेत, तर मागील वर्षी पावसाअभावी शेंगदाण्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने भाव कडाडले आहेत. त्यामुळे यंदा सर्व प्रकारचा चिवडा महागाईमुळे रुचकर होणार नाही, असे दिसते. रवा, मैदा, आटा, गोटा खोबरे या वस्तूंचे भाव मात्र जवळपास सारखेच आहेत. त्यात फारसा चढउतार झालेला नाही. चिवड्यासाठी दगडी पोहे, भोजके पोहे, पातळ पोहे आणि मका पोह्याचा अधिक वापर केला जातो. पण पावसामुळे नवीन कच्चा माल बाजारात यायला विलंब झाला आहे. त्यामुळे पोह्याचे भाव वाढले आहेत, तर हरभराडाळ वाढल्याने बेसन व भाजक्या डाळीचे भाव मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास दुपटीने वाढले असल्याचे व्यापारी कांतिलाल गुंदेचा यांनी सांगितले.घाऊक बाजारातील वस्तूंचे भाववस्तू३१ आॅक्टोबर २०१५१५ आॅक्टोबर २०१६वनस्पती तूप (१५ किलो)७१०-९८०९८०-१२६०सूर्यफुल रिफार्इंड तेल११००-१२६०११००-१२५०साखर (क्विंटल)२६५०-२७००३५७५-३६००गूळ२५५०-२८७५३४००-४३००हरभराडाळ६०००-६५००१२०००-१३२००शेंगदाणा (गुजरात जाडा)६५००-६७००७५००-८५००पातळ पोहे३१००-३५००३७००-३९००दगडी पोहे२४००-२५००३०००-३२५०भाजके पोहे४३०-४५०५००-५२०भाजकी डाळ (४० किलो)३१००-३२००५४००-५७००बेसन (५० किलो)३४००-३६००६३००-६६००
दिवाळी फराळाला ‘महागाई’ची फोडणी
By admin | Updated: October 16, 2016 03:53 IST