शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणीपात्र कोरडे, पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 02:39 IST

आळंदी - मरकळ येथील इंद्रायणी नदी पात्र पाण्या अभावी कोरडे आहे. पाणी नदीत सोडण्याची मागणी पुणे पाटबंधारे विभागाकडे मरकळचे पोलीस पाटील बाळासाहेब टाकळकर यांनी केली आहे.मरकळ परिसरातून वाहणा-या इंद्रायणी नदी पात्रात पाणी नसल्याने नगदी पिके जळू लागली आहेत. जनावरांना पिण्याचे पाण्यासाठी नदी पात्रात पाणी सोडण्याची गरज असल्याने तात्काळ पाणी सोडण्याची ...

आळंदी - मरकळ येथील इंद्रायणी नदी पात्र पाण्या अभावी कोरडे आहे. पाणी नदीत सोडण्याची मागणी पुणे पाटबंधारे विभागाकडे मरकळचे पोलीस पाटील बाळासाहेब टाकळकर यांनी केली आहे.मरकळ परिसरातून वाहणा-या इंद्रायणी नदी पात्रात पाणी नसल्याने नगदी पिके जळू लागली आहेत. जनावरांना पिण्याचे पाण्यासाठी नदी पात्रात पाणी सोडण्याची गरज असल्याने तात्काळ पाणी सोडण्याची मागणी टाकळकर यांनी केली आहे.इंद्रायणी नदी पात्रात वाडिवळे अथवा आंध्रा बंधा-यातून पाणी सोडले तर पिकांना तसेच जनावरांचे पिण्याचे पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच जलस्रोत वाढतील असे त्यांनी सांगितले. मरकळ परिसरात शेताचे उत्पन्न घेतले जात आहे.उसाचे मोठे क्षेत्र असल्याने येथील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी बंधा-याचे बर्गे (ढापे) बसविण्यासह ढापे देखभाल दुरुस्ती व बंधाऱ्याचे मजबुतीकरण करण्याची गरज आहे.पिकांना जीवदान देण्यास पाण्याची गरज असल्याने पाणी सोडण्याची मागणी शेतक-यांचे वतीने पोलीस पाटील टाकळकर यांनी केली आहे. आळंदी इंद्रायणी नदीत पाणी पोहचले मरकळ प्रतीक्षेत दरम्यान इंद्रायणी नदी वरील धरणातून सोडण्यात आलेले पाणी आळंदी नदी पात्रात पोहचले असून उद्या गुरुवार (दि. ५) उशिरापर्यंत मरकळ बंधा-यात पाणी येईल, असे मोशी पाटबंधारे विभागाचे गदादे यांनी सांगितले.पाणी गळती रोखल्यास साठा वाढण्यास मदतपाणीगळती रोखल्यास पाणीसाठा वाढणार आहे.एप्रिलचे पहिल्याच आठवड्यात नदीपात्रात पाणी नसल्याने शेतमाल उत्पादकांनी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. इंद्रायणी नदीवर परिसरात अनेक शेतीपंप असून सुमारे ३ ते ४ किलोमीटरपर्यंत पाईपलाईन करून आणले आहे. ऊस व इतर पिकांना पाणी नसल्याने पिके जळू लागली आहेत.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीriverनदीPuneपुणे