शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर कोरियासह भारताचे संबंध वृद्धींगत करणार :  अतुल गोतसुर्वे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 20:15 IST

पुणे विभागातील पासपोर्ट प्रक्रिया सुरळीत करण्यात चोख भूमिका बजावणारे व सध्या इंडियन कौन्सिल आॅफ कल्चरल रिलेशन विभागाचे संचालक अतुल गोतसुर्वे यांची नुकतीच उत्तर कोरियाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे

ठळक मुद्देउत्तर कोरियाच्या राजदूतपदी निवडीबद्दल सत्कार उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किंग जोंग भेटल्यावर त्यांना भगवान बुद्धांची मूर्ती भेट देईन

पुणे : राजदूत म्हणजे देशाचा प्रतिनिधी असतो. दोन देशांमधील राजकीय उद्योग, सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याची धुरा राजदुतांकडे असते. भारत आणि उत्तर कोरियाचे ऐतिहासिक संबंध गेल्या अनेक वर्षांपासून चांगले आहेतच; ते अधिक वृद्धींगत होण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, असे मत अतुल गोतसुर्वे यांनी व्यक्त केले.  पुणे विभागातील पासपोर्ट प्रक्रिया सुरळीत करण्यात चोख भूमिका बजावणारे व सध्या इंडियन कौन्सिल आॅफ कल्चरल रिलेशन विभागाचे संचालक अतुल गोतसुर्वे यांची नुकतीच उत्तर कोरियाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. त्या निमित्ताने सरहद संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सरहद भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमात खडके फौंडेशनचे संजीव खडके यांच्या हस्ते त्यांचा पुणेरी पगडी व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार व ट्रस्टी शैलेश वाडेकर, अनुज नहार हे उपस्थित होते.   गोतसुर्वे यांनी मेक्सिको आणि क्युबा येथे काम करताना आलेले अनुभव उपस्थितांना सांगितले. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किंग जोंग यांना भेटल्यावर भारताच्या वतीने त्यांना भगवान बुद्धांची मूर्ती भेट देईन, असेही ते म्हणाले. वयाच्या २८ व्या वर्षी भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये दाखल झालेले व वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी राजदूत झालेल्या या मराठी माणसाची प्रेरणा तरुणांनी घ्यावी, असे आवाहन संजीव खडके यांनी या प्रसंगी केले. संजय नहार यांनी प्रास्ताविक केले व शैलेश वाडेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेSanjay Naharसंजय नहारSarhadसरहद संस्था