शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

भारतीय म्हणजेच आपण सर्व हिंदू आहोत : अनिरुध्द देशपांडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 1:18 PM

पुणे : भारतीय हा भूगोलवादी तर हिंदू हा समाजवादी शब्द आहे. भारताची पूर्वापार चालत असलेली संस्कृती हिंदू संस्कृती आहे. ...

ठळक मुद्दे‘हिंदू राष्ट्रांची हृदयस्पंदने’ या खंडांचा प्रकाशन समारंभ

पुणे : भारतीय हा भूगोलवादी तर हिंदू हा समाजवादी शब्द आहे. भारताची पूर्वापार चालत असलेली संस्कृती हिंदू संस्कृती आहे. भारतीय म्हणजेच आपण सर्व हिंदू आहोत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख अनिरुद्ध देशपांडे यांनी व्यक्त केले. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभाग यांच्या वतीने पी. परमेश्वरन लिखित ‘हिंदू राष्ट्रांची हृदयस्पंदने’ या खंडांचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते खंडांचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी अनुवादक ज्येष्ठ पत्रकार दत्ता पंचवाघ, अरुण करमरकर, भगवान दातार, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर, किरण कीर्तने आदी उपस्थित होते. विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष पी. परमेश्वरन यांच्या गेल्या ५० वर्षांतील साहित्याचा संपादित ग्रंथसंग्रह इंग्रजी भाषेत ‘हार्ट बिट्स आॅफ हिंदू नेशन’ या नावाने गेल्या वर्षीच प्रसिद्ध झाला. या ग्रंथसंग्रहांचा मराठी अनुवाद ३ खंडांमध्ये प्रसिद्ध झाला.देशपांडे म्हणाले, समाज संस्कृती उत्पन्न करतो. त्यामुळे ही समाजस्वीकृत गोष्ट आहे. संस्कृती ही अधिक काळ टिकून राहते. काळानुसार मानवी चिंतनात बदल होत असतात. संस्कृतीत बदल होत नाहीत. हिंदू हा विस्तारवादी धर्म आहे. पण हिंदूच्या संस्कृतीला हीन दिन करून टाकावे, असे पाश्चात्य लोकांचे विचार होते. परंतु भारतीय संस्कृतीत सुप्त ताकद असल्याने ती अजूनही टिकून आहे. हे तिन्ही ग्रंथ आपल्याला मिळालेले लाभदायक चिन्ह आहे. यातून आपल्याला पी. परमेश्वरन यांचा कर्तृत्व, लिखाण, सामाजिक कार्य असा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो.मला एका खंडाच्या अनुवादाची संधी मिळाली. त्यामध्ये हिंदू संस्कृतीच्या विविध संकल्पनांचे प्रदर्शन केले आहे. श्रद्धा ही फक्त हिंदूंमध्ये असते. हे पुस्तकातून दिसून येते. कार्ल मार्क्स आणि विवेकानंद अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला आहे. दोघांच्या विचारांचा केंद्रबिंदू माणूसच आहे, असे दातार यांनी नमूद केले. ..........हिंदू राष्ट्राची संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करावाहिंदू राष्ट्र संकल्पनेच्या विविधतेची सखोल चिकित्सा ग्रंथातून मांडली आहे. त्याचा अनुवाद करणे आमच्यासाठी आव्हानात्मक होते. ग्रंथांचा अनुवाद करताना आमच्या ज्ञान कक्षेला वाव मिळाला आहे. सर्वांनी हे ग्रंथ वाचून हिंदू राष्ट्राची संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, असे अरुण करमरकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेHinduहिंदूRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ