शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

डब्ल्यु एमओकडून भारतीय हवामान विभागाची प्रशंसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 16:04 IST

भारतीय हवामान विभागातील आरएसएमसी या विभागा जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यु एम ओ) प्रशंसा का केली आहे तर मग वाचाच

ठळक मुद्देसागर, मेकुनू चक्रीवादळाचा दिला अचूक अंदाज भारतीय हवामान विभागाने इन्सॅट ३डी तसेच अन्य अत्याधुनिक साधनाच्या सहाय्याने सातत्याने मागोवा

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या सागर आणि मेकुनू चक्रीवादळाचा अतिजलद मागोवा घेऊन त्यांचा अंदाज अधिक अचूक पध्दतीने भारतीय हवामान विभागाने दिल्यामुळे होणारे नुकसान कमीत कमी झाले़. भारतीय हवामान विभागातील आरएसएमसी या विभागाच्या या कामगिरीचे जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यु एम ओ) प्रशंसा केली आहे़. भारतीय हवामान विभागातील रिजनल स्पेशलाईज मेट्रोलॉजिकल सेंटर फॉर टॉपिकल सायक्लोन ओव्हर नॉर्थ इंडियन ओशन (आरएसएमसी) या केंद्रामार्फत दक्षिण भारतीय समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाला लक्ष ठेवले जाते़. अरबी समुद्रात १६ ते २०मे दरम्यान सागर हे चक्रीवादळ निर्माण झाले होते़. हे चक्रीवादळ १९ मे रोजी सोमालियाच्या किनारपट्टीवर ताशी ७० ते ९५ किमी वेगाने धडकले़. समुद्रातून पश्चिमेच्या दिशेला १९६५ नंतर अशा प्रकारे वळलेले हे पहिलेच चक्रीवादळ होते़. जेव्हा अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाला, तेव्हापासून या चक्रीवादळाचा भारतीय हवामान विभागाने इन्सॅट ३डी तसेच अन्य अत्याधुनिक साधनाच्या सहाय्याने सातत्याने मागोवा घेतला़. त्यांची माहिती जगभर प्रसारित केली़.चक्रीवादळ कधी व कोणत्या ठिकाणी धडकणार याची सर्वात प्रथम माहिती ४२ तास आधी भारतीय हवामान विभागाने जाहीर केली होती़. त्याचा संपूर्ण मार्गाविषयीचा अचूक अंदाज जाहीर केला होता़. त्यामुळे सोमालियासारख्या गरीब देशात मागील चक्रीवादळाच्या तुलनेत अतिशय कमी नुकसान झाले़. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या मेकुनू या चक्रीवादळाचा पहिला अंदाज हवामान विभागाने १३८ तास अगोदर २० मे रोजी सर्वप्रथम दिला होता़. त्यानंतर त्यांनी दर सहा तासाने त्याची सर्व माहिती व अंदाज जाहीर केले होते़. हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज आणि प्रत्यक्ष चक्रीवादळाचा मार्ग व ते ओमानच्या किनारपट्टीवर धडकण्याची वेळ त्यात अत्यंत कमी अंतर होते़. हवामान विभागाच्या अंदाजामुळे यापूर्वीच्या वादळात येमन येथे झालेल्या नुकसानापेक्षा खूप कमी हानी यावेळी झाली़. सागर आणि मेकुनू चक्रीवादळादरम्यान भारतीय हवामान विभागाने अनुक्रमे २७ आणि ४३ बुलेटिन प्रसिद्ध केली़. ही बुलेटिन डब्ल्यु एम ओच्या सदस्यांना वितरीत करण्यात आली़. आरएसएमसीचे प्रमुख डॉ़ एम़ मोहापात्रा यांनी ओमान, येमेन व इतर आंतरराष्ट्रीय विशेषज्ञासमोर मेकुनूविषयी सादरीकरण केले होते़. या सर्व बाबींच्या परिणामामुळे येमेन, ओमान व त्या लगतच्या देशात चक्रीवादळापूर्वीच आवश्यक ती खबरदारी घेतल्याने मनुष्यहानी कमी झाली़. त्यामुळे जागतिक हवामान संघटनेचे भारताच्या या कामगिरीची संघटनेने प्रशंसा केली आहे़.

............................

आरएसएमसी, नवी दिल्ली यांच्या सागर आणि मेकुनू या चक्रीवादळाची आगाऊ सुचना देणाऱ्या बुलेटिन डब्ल्युएमओने युएन आणि त्यांच्या सदस्यांना वितरीत केले़. सर्वांकडून त्यांची प्रशंसा करण्यात आली आहे़. त्यामुळे आम्ही आरएसएमसी यांना विनंती करतो की, त्यांनी भविष्यातही चक्रीवादळासंबंधित माहिती सदस्यांना द्यावी़.तोयाग पेंग, प्रमुख ट्रॉपिकल सायक्लोन प्रोग्राम, वर्ल्ड मेट्रोलॉजीकल आॅगनासेशन

टॅग्स :Puneपुणेweatherहवामान