शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
5
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
6
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
7
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
9
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
11
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
12
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
13
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
14
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
15
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
16
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
17
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
18
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
19
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
20
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?

आशियाई क्रीडा स्पर्धेतील 'सुवर्ण' पदक विजेत्या ऋतुजा भोसलेचे लक्ष्य ऑलिम्पिक! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 13:19 IST

चीनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची टेनिस स्टार ऋतुजा भोसले हिने रोहन बोपन्नासह मिश्र दुहेरीचे सुवर्ण पदक पटकावले.

पुणे : चीनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची टेनिस स्टार ऋतुजा भोसले हिने रोहन बोपन्नासह मिश्र दुहेरीचे सुवर्ण पदक पटकावले. आता तिने २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळवण्यासोबतच क्रमवारीत टॉप-२०० मध्ये स्थान पटकावून कारकिर्दीत अधिकाधिक ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

आशियाई क्रीडा स्पर्धेतून पुण्यात परतल्यानंतर ऋतुजाचा पुनित बालन ग्रुपचे (PBG) अध्यक्ष पुनित बालन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जान्हवी धारिवाल बालन यांच्यासह महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि ऋतुजाचे पती स्वप्नील गुगळे व तिची आई हे उपस्थित होते.  

सत्कार समारंभात ऋतुजाने तिचा निर्धार बोलून दाखवला. “मी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केले आहे.  इतर खेळांप्रमाणे टेनिसमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून ऑलिम्पिक तिकीट निश्चित करता येत नाही. मला माझे रँकिंग अधिक चांगले करायचे आहे आणि ग्रँड स्लॅममध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी ३२० वरून टॉप-२०० पर्यंत मजल मारायची आहे,” असे ऋतुजाने यावेळी सांगितले. 

 PBG च्या सहाय्याने भोसलेने तिच्या जागतिक क्रमवारीत लक्षणीय प्रगती केली आहे. एकेरीमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग ३१३ आहे. तिने गेल्या दोन वर्षांत दुहेरीतील सहा जेतेपदासह एकूण सात आयटीएफ जेतेपद जिंकली आहेत. “माझ्यासाठी आणि रोहन (बोपण्णा) साठी भारताचे प्रतिनिधित्व करणे आणि १३ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकणे हा अभिमानाचा क्षण होता. आम्हाला या व्यासपीठावर पोहोचवण्यासाठी मिळालेल्या सर्व मदतीबद्दल आणि समर्थनाबद्दल मी आभारी आहे,” असे ऋतुजा पुढे म्हणाली. आर्थिक मदतीमुळे तिला अधिक आधार मिळाला. निधीची कमतरता आणि इतर विविध आव्हानांची चिंता करण्याऐवजी तिला तिच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यास मदत झाली. “ऋतुजा ही देशातील अनेक तरुण होतकरू खेळाडूंसाठी आदर्श आहे. PBG ऋतुजासारख्या प्रतिभावान खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना आवश्यक आर्थिक मदत देण्यासाठी वचनबद्ध आहे. मला खात्री आहे की ऋतुजा तिची मेहनत आणि ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवेल आणि ग्रँड स्लॅममध्ये भाग घेईल,”असे  पुनित बालन यावेळी म्हणाले. 

पुनित बालन यांच्याकडे टेनिस, हँडबॉल, टेबल टेनिस, खो खो, बॅडमिंटन, क्रिकेट, आर्म रेसलिंग आणि बुद्धिबळ या विविध क्रीडा लीगमधील आठ क्रीडा संघांचे मालकी हक्क आहेत. शिवाय विविध क्रीडा प्रकारांमध्ये देशभरातील सुमारे ५० इच्छुक खेळाडूंना आर्थिक सहाय्य प्रदान करतात. 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३TennisटेनिसGold medalसुवर्ण पदक