शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांमध्ये ११८ परदेशी नागरिकांना दिले भारतीय नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 06:00 IST

नागरिकत्व मिळालेल्यांमध्ये सर्वांधिक ११७ पाकिस्तानचे तर एक बांगलादेशचा नागरिक 

ठळक मुद्दे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूरपाकिस्तान, बांगलादेश आणि अफगणिस्तान या देशामधून आलेले नागरिक ‘लॉग टर्म व्हिस’ वर

सुषमा नेहरकर-शिंदेपुणे : केंद्र शासनाने सन २०१६ आणि १८ मध्ये प्रकाशित केलेल्या राजपत्रामध्ये राज्यात वास्तव्यास असणारे हिंदू, शिख, बौध्द, जैन, पारसी आणि ख्रिश्चन वर्गातील अल्पसंख्यांक पाकिस्तानी, बांगलादेशी आणि अफगाणी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या अधिकाराचा वापर करुन पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या सुमारे ११८ परदेशी नागरिकांना भारतीय नागरिक्तव देण्यात आले असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.     केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले. या वादग्रस्त विधेयकामध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु विधेयक मंजूर झाल्यानंतर याबाबत विधेयकाच्या बाजूने आणि विरोधामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षांत किती परदेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले याबाबतचा आढावा घेण्यात आला. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगणिस्तान या देशामधून आलेले नागरिक ‘लॉग टर्म व्हिस’ वर जिल्ह्यात ग्रामीण भागात, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये राहत आहेत. या सर्व नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार केंद्र शासनाने पुणे जिल्ह्यात जिल्हाधिका-यांना दिले आहेत. त्यानुसार सन २०१६ मध्ये जिल्हा प्रशासनाने २१ नागरिकांना आणि २०१७ ते २०१९ मध्ये एकूण १६९ नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी अर्ज केला होता. भारतीय नागरिकत्व देण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची छाननी करण्यात आली. गुप्तचर विभागाकडूनही (आयबी) तपासणी करण्यात आली. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ९७ नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले. अद्याप ५२ लोकांचे प्रस्ताव प्रलंबित असून, कागदपत्रांची खात्री करुन घेण्यात येत आहे.            सध्या पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पाकिस्तान, बांगलादेश आणि आफगणिस्तान येथील नागरिक 'लाँग टर्म व्हिसा' वर राहत आहेत. यात पाकिस्तान, बांगलादेशाचे नागरिकत्व असल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. प्रत्येक वेळी त्यांना पासपोर्ट, व्हिसाचे नूतनीकरण करणे आणि अन्य सरकारी सोपस्कार पार पाडावे लागत होते. परंतु भारतीय नागरिकत्व मिळाल्याने आता या नागरिकांची या सर्व त्रासातून सुटका झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेAfghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेश