शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

G20 Summit In India: 'जी-२०' परिषदेची एक बैठक पुण्यात होणार, २० देशांचे तब्बल ३०० मंत्री येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 23:12 IST

भारत देशाने जगातील विविध विकसित देशांचा सहभाग असलेल्या ‘जी-२०’ परिषदेचे यजमान पद यंदा स्वीकारले असून, पुण्यात या परिषदेची एक बैठक होणार आहे.

पुणे :

भारत देशाने जगातील विविध विकसित देशांचा सहभाग असलेल्या ‘जी-२०’ परिषदेचे यजमान पद यंदा स्वीकारले असून, पुण्यात या परिषदेची एक बैठक होणार आहे. यावेळी परदेशी पाहुणे पुण्यात दाखल होणार असून, पुण्यातील इतिहास, वैविध्यपूर्ण संस्कृती ते जाणून घेणार आहेत.    डिसेंबर , २०२२ पासून सुरू होणाऱ्या व भारतात होणाऱ्या ‘जी-२०’ परिषदेच्या विविध बैठका पैकी, महाराष्ट्र राज्यात मुंबई व पुणे येथे प्रत्येकी एक बैठक घेतली जाणार आहे. यानुसार केंद्र सरकारच्या पथकाने बुधवारी पुणे भेटीत या मंत्र्यांसाठी राहण्याची व्यवस्था, त्यांची वाहन, सुरक्षा व्यवस्था तसेच संभाव्य कार्यक्रमांच्या अनुषंगाने चाचपणी केली आहे.  

‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुण्यात या २० देशांतील ३०० मंत्री दाखल होणार असून ते पुण्यातील इतिहास, वैविध्यपूर्ण संस्कृती जाणून घेणार आहेत. याकरिता केंद्र  सरकारचे पथक आज पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी  विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेत या परिषदेच्या नियोजन विषयक चर्चा केली.

‘भारताला २०२२ साली स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं पूर्ण होणार आहेत. भारत देश जगात सगळ्यांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून येथे येऊन भारताचा समृद्ध इतिहास आणि वैविध्यपूर्ण संस्कृती जाणून घ्या आणि भारताच्या पाहुणचाराचाही आस्वाद घ्या,’ असे मोदींनी ट्विटद्वारे आवाहन केले होते. त्यानुसार केंद्र सरकारच्या पथकानेही पुण्यातील कार्यक्रमांची आखणी करताना ऐतिहासिक स्थळांची आवर्जुन माहिती घेतली आहे. यावेळी ‘जी-२०’ गटातील शक्तीशाली २० देशांच्या ३०० मंत्र्यांचे पुणे सफर होणार आहे. यावेळी आलेल्या पाहुण्यांना पुण्यातील संस्कृती व ऐतिहासिक वारसा दाखवितानाच, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज आलेल्या केंद्रीय पथकाने सर्व पाहणी केली. यात आलेल्या पाहुण्यांची निवास व्यवस्था, प्रवास व्यवस्था करण्यासाठी व्ही व्हीआयपी गाड्या यांची व्यवस्था करण्याबाबत स्थानिक यंत्रणेला सूचित केले आहे.

डिसेंबर २०२२ पासून ही परिषद होणार असली तरी याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये पुण्याचा समावेश करण्यात आल्याने, या परिषदेच्या माध्यमातून पुण्याच्या नावलौकिकात आणखी एक मनाचा तुरा बसणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी