शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र अधिकारी

By admin | Updated: December 3, 2015 03:34 IST

राज्य सरकारकडे असणाऱ्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करू, मात्र महापालिकेने शहरातील समस्या सोडवण्यासाठीही प्रभावी उपाय योजावेत, आमदारांचे प्रश्नही महत्त्वाचे असून

पुणे : राज्य सरकारकडे असणाऱ्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करू, मात्र महापालिकेने शहरातील समस्या सोडवण्यासाठीही प्रभावी उपाय योजावेत, आमदारांचे प्रश्नही महत्त्वाचे असून त्यांच्या निराकरणासाठी उपायुक्त दर्जाचा स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा, अशी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी पालिका आयुक्तांना आज केली.आमदारांसमवेत पालिका आयुक्त व अधिकारी अशी संयुक्त बैठक बापट यांनी आज महापालिकेत घेतली. आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, जगदीश मुळिक, शरद रणपिसे, दीप्ती चवधरी या वेळी उपस्थित होते. आयुक्त कुणाल कुमार यांनी सुरूवातीला राज्य सरकारकडे असलेल्या पालिकेच्या सुमारे ४९० कोटी रुपयांच्या थकबाकीचा उल्लेख केला. पीएमपीसाठीची बसखरेदी, भामा आसखेड प्रकल्प, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र यासाठीची निधीही राज्य सरकारकडे प्रलंबीत असल्याची माहिती त्यांनी दिली. हा निधी त्वरित मिळावा, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही बापट यांनी दिली. त्याचबरोबर शहरातील कचऱ्यासारखे प्रश्न सोडवण्यात पालिका प्रशासन कमी पडते आहे, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. बांधकाम व्यावसायिक महापालिकेला देत असलेल्या रिकाम्या जागांचा वापर करता येईल का याचा विचार करावा, अशी सूचना बापट यांनी केली. दलितवस्ती सुधारणासाठी पालिकेला ४ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, त्याच्या विनियोगापुर्वी आमदारांशी चर्चा केली जावी, ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे, तिथेच हा निधी खर्च व्हावा, अशी अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली.पालिकेकडून आमदारांना सुचवलेल्या कामांकडे दुर्लक्ष होते अशी तक्रार आमदारांनी केली. बापट यांनी त्याची दखल घेत आयुक्तांना आमदारांच्या कामांकडे लक्ष देण्याची सुचना केली. प्रत्येक आमदाराने त्याच्या मतदारासंघातील ५ महत्त्वाचे प्रश्न थेट आयुक्तांकडे द्यावेत. या प्रश्नांच्या निराकरणासाठी उपायुक्त दर्जाचा एक स्वतंत्र अधिकारीच नियुक्त केला जाणार आहे.कचरा निर्मुलनाच्या कामासाठी आपण १० लाख रुपये दिले होते, मात्र त्याचा वापर झाला नाही, अशी तक्रार आमदार रणपिसे यांनी केली. मेधा कुलकर्णी यांनीही तसेच सांगितले. त्यावर बापट यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली तर एका अधिकाऱ्याने १० लाख रुपयांत काय होणार, असे उत्तर दिले, बापट यांनी त्यावर संतप्त होत निदान घंटागाडी तरी घ्यायची, असे सांगितले.