पुणे : महापालिका प्रशासना पाठोपाठ शिक्षण हक्क कायद्यानुसार, महापालिका आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आलेल्या शिक्षण मंडळातील पदभरतीची नियमावली आणि पदांच्या संख्या निश्चित करण्यासाठी आकृतिबंध तयार करून तो एका महिन्यात सादर करावा, असे आदेश पक्षनेत्यांच्या बैठकीत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना देण्यात आले. शिक्षण मंडळाच्या विविध प्रश्नांबाबत तसेच कामकाजाबाबत चर्चा करण्यासाठी पक्षनेत्यांची शुक्रवारी खास बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी आॅगस्ट २०१४ मध्ये राज्य सरकारने पुणे महापालिकेची सेवा प्रवेश नियमावली आणि आकृतिबंध मंजूर केला आहे. पालिकेचे शिक्षण मंडळ ही स्वायत्त संस्था असून, त्यांचीही सेवा प्रवेश नियमावली व आकृतिबंध तयार करणे आवश्यक होते. पण तसे न करता महापालिकेची सेवा प्रवेश नियमावली शिक्षण मंडळाला लागू केली होती.
शिक्षण मंडळाचा स्वतंत्र आकृतिबंध
By admin | Updated: March 14, 2015 06:18 IST