शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शाकाहारींना हॉटेल मॅनेजमेंटची स्वतंत्र पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 19:39 IST

हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत पुण्यातील सनदी लेखापाल चंद्रशेखर लुणिया हे सहा वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत.

ठळक मुद्देदेशातील सर्व २१ केंद्रीय हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पदवी अभ्यासक्रम सुरूशाकाहारी विद्यार्थ्यांना इच्छा नसताना मांसाहाराचे प्रशिक्षण घ्यावे लागते.

पुणे : येत्या शैक्षणिक वर्षापासून देशातील सर्व २१ केंद्रीय हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. यापूर्वी केवळ सहा संस्थांमध्ये शाकाहार व मांसाहार असे दोन पर्याय देण्यात आले होते. त्यामुळे देशभरातील शाकाहारी विद्यार्थ्यांना केवळ शाकाहाराची पदवी घेण्याचे पर्याय खुले झाले आहेत. हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत पुण्यातील सनदी लेखापाल चंद्रशेखर लुणिया हे सहा वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. या पाठपुराव्यामुळे मागील दोन वर्षांत पर्यटन मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सहा केंद्रीय संस्थांमध्ये असा अभ्यासक्रम सुरू झाला. आता उर्वरित १५ संस्थांमध्येही शाकाहारी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी लुणिया यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, अचल जैन, नरेंद्र छाजेड आदी उपस्थित होते. हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात सुमारे ४० विषय शिकविले जातात. त्यामध्ये एक विषय अन्नपदार्थ बनविणे हा आहे. त्याअंतर्गत शाकाहारी व मांसाहारी पदार्थ शिकविले जातात. त्यामुळे शाकाहारी विद्यार्थ्यांना इच्छा नसताना मांसाहाराचे प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यासाठी अभ्यासक्रमात शाकाहारी पर्याय सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला काहीप्रमाणात यश मिळू लागले आहे. दोन वर्षांपुर्वी गांधीनगर, भोपाळ व जयपुर तर मागील वर्षी चेन्नई, हाजीपूर व शिलाँग येथील संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. येत्या शैक्षणिक वर्षापासून उर्वरित संस्थांमध्ये हा पर्याय देण्याचा निर्णय पर्यटन मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे शाकाहारी विद्यार्थ्यांना शाकाहारी पदार्थ बनविण्याचे स्वतंत्र प्रशिक्षण घेण्यासाठी पर्याय उपलब्ध झाले आहेत, असे लुणिया यांनी सांगितले. तसेच राज्य शासन तसेच अन्य खासगी संस्थांनाही यासाठी पुढाकार घेऊन असे पदवी अभ्यासक्रम सुरू करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.------------आमचे कुटूंब शाकाहारी असल्याने मुलाला केवळ शाकाहारी शिकवत असलेल्या हॉटेल मॅनेजमेंट संस्थेमध्ये प्रवेश हवा होता. पण देशात अशी एकही संस्था सापडली नाही. त्यामुळे सहा वर्षांपूर्वी शाकाहारींनी मांसाहार बनविणे व शिक्षण याला विरोध करून शाकाहारी शिक्षण हा पर्याय सुचविला होता. केंद्रीय संस्थांप्रमाणेच आता अन्य संस्थांमध्येही शाकाहारी पर्याय सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.- चंद्रशेखर लुणिया-----------------------

 

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नhotelहॉटेलvegetableभाज्या