शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

अपक्ष उमेदवारांना '' नोटा '' पेक्षा कमी मते

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 11:46 AM

बहुतांश विधानसभा मतदार संघात अनेक अपक्ष उमेदवारांना नोटाची आकडेवारी सुध्दा गाठता आली नाही.

ठळक मुद्देनोटाचा वापर करणाऱ्या मतदारांचे मन वळवण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर असणार विविध स्वयंसेवी संस्थांकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती मागील लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात तब्बल ४१ हजाराहून अधिक नोटाचा अवलंब

पुणे : पसंतीचा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात नसल्यास मतदारांना नन ऑफ द अबो (नोटा) वापरण्याचा अधिकार मतदारांना देण्यात आला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील तब्बल ४१ हजाराहून अधिक मतदारांनी नोटाचा अवलंब केला होता. बहुतांश विधानसभा मतदार संघात अनेक अपक्ष उमेदवारांना नोटाची आकडेवारी सुध्दा गाठता आली नाही. त्यामुळे नोटाचा वापर करणाऱ्या मतदारांचे मन वळवण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर असणार आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून राजकीय पक्षांकडून लोकसभेचे आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्येक मतदाराच्या लोकप्रतिनिधींकडून काही अपेक्षा असतात. त्याचप्रमाणे काही मतदार उमेदवाराला नाही तर राजकीय पक्षाला मतदान करत असतात. काही पक्षांचा पारंपरिक मतदार असतो. त्यामुळे एखाद्या मतदारसंघात आपल्या पक्षाचा उमेदवार उभा नाही,असे निदर्शनास आल्यास मतदारांकडून नोटाचा वापर होतो. त्यातच गेल्या काही कालावधीपासून वेगवेगळ्या पक्षातून आयात केलेले उमेदवार निवडणूकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यातील किती उमेदवार नोटा देणाऱ्या मतदारांचे मन वळविण्यात यशस्वी होणार हे येत्या २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानांतर २३ मे रोजी केल्या जाणाऱ्या मतमोजणीवरून समोर येईल.विविध स्वयंसेवी संस्थांकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती केली जात आहे.शासनाकडूनही मतदार जागृतीसाठी विविध उपाय योजना केली जात आहे.प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना व्यतिरिक्त अपक्ष लोकसभा निवडणूक लढणारे काही उमेदवार आहेत.मात्र,त्यांना नोटाच्या मतदानाचा आकडाही गाठता आला नाही.२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत अरूण भाडिया यांनी अपक्ष निवडणूक लढवली. वडगावशेरी मतदार संघातून त्यांना केवळ १४४९ मते मिळाली तर नोटाची मते ११९८ होती.पुणे लोकसभा मतदार संघातील नोटा मतदारांची आकडेवारी (मतदारसंघ निहाय)मतदारसंघाचे नाव          मतदारांची संख्या वडगावशेरी                         ११९८शिवाजींनगर                      १०४८कोथरूड                            ११२९पर्वती                                १०१६पुणे कॅन्टोन्मेंट                  ९५१कसबा                             ११०१---एकूण                             ५३१४----बारामती लोकसभा मतदार संघातील नोटा मतदारांची आकडेवारी मतदारसंघाचे नाव     मतदारांची संख्या दौंड                                ६०इंदापूर                         १३४७बारामती                      १९५२पुरंदर                          १५३०भोर                             २०३७खडकवासला              ६२३३-एकूण                       १३,१५९--शिरूर लोकसभा मतदार संघातील नोटा मतदारांची आकडेवारी मतदारसंघाचे नाव     मतदारांची संख्या जुन्नर                २१८८आंबेगाव          १७९७खेड-आळंदी     १७४३शिरूर               १५८९भोसरी             १७८६हडपसर         २८८५--एकूण            ११,९८८---मावळ लोकसभा मतदार संघातील नोटा मतदारांची आकडेवारी मतदारसंघाचे नाव     मतदारांची संख्या पनवेल                                 २७१२कर्जत                                   १२२१उरण                                  १७८४मावळ                                १५१६चिंचवड                             २०९१पिंपरी                                 १८५४----एकूण         ११,१७८ ---

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान