शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day 2022: पुढच्या दोन ऑलंम्पिकमध्ये भारत पदकांची लयलूट करेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 12:22 IST

पुणे लोकमतभवनमध्ये ध्वजारोहण उत्साहात

पुणे : क्रीडा क्षेत्रातकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे करिअर म्हणून पालक क्रीडा क्षेत्राकडे पाहात आहेत. त्याच्याबरोबर शासनाच्या पातळीवर खेळाडूंना खूप प्रोत्साहन दिले जात आहे त्यामुळे यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीयांनी जशी भरीव कामगिरी केली. तशीच कामगिरी पुढच्या दोन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये दिसेल आणि भारत ऑलिंपिक स्पर्धेत पदकांची लयलूट करेल, असा विश्वास भारताची सुवर्णकन्या आणि ऑलंपिक खेळाडू, नेमबाज तेजस्विनी सावंत यांनी व्यक्त केला.

पुण्यातील लोकमत भवनमध्ये तेजस्वीनी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमतचे व्हाईस प्रेसिडेंट निनाद देसाई हे होते. तिरंगी फुग्यांनी सजवलेल्या लोकमतच्या वैशिष्ट्यपूर्ण लाल विटांच्या इमारतीमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तेजस्विनीचे पती समीर दरेकर, लोकमतचे अधिकारी, कर्मचारी आणि सखी मंचच्या पुण्यातील बहुतांश सदस्य उपस्थित होत्या.

सावंत म्हणाल्या, आजही राष्ट्रगीताची धून माझ्या कानावर पडतातच माझे डोळे पाणवले जातात कारण ज्या-ज्या वेळी मी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळवले त्यावेळी मैदानात भारताचे राष्ट्रगीत वाजवले गेले आणि भारताच्या  राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ तिथे उपस्थित असलेले इतर सर्व देशाचे खेळाडू नागरिक उठून उभे रहातात. या मोठ्या सन्मानाचा आपण महत्त्वाचा भाग असतो ही गोष्ट खूप अभिमानास्पद असते.सध्या भारतीय खेळाडूंना खूप चांगले दिवस आलेले आहेत. त्यांना अनेक संधी उपलब्ध होत आहेत. शासकीय पातळीवरसुद्धा खेळाडूंना प्रोत्साहन बरोबर उत्तम आर्थिक तरतूद पुरवली जात आहे. त्यामुळे भविष्यात भारत ऑलिंपिकमध्ये उत्तम कामगिरी करेल.

प्रारंभी सुरक्षा रक्षकाच्या प्लाटूनने तेजस्विनी यांना मानवंदना दिली, त्यानंतर राष्ट्रीय सलामी देत ध्वजवंदन झाले. सूत्रसंचालन ओंकार दीक्षित यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021LokmatलोकमतIndependence Dayस्वातंत्र्य दिन