शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

इंदापुरात तलाव झाले कोरडे, दुष्काळाची छाया गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 02:25 IST

यंदा डिसेंबर महिना सुरू होण्याअगोदरच ग्रामीण भागातील दुष्काळाची छाया गडद होऊ लागल्ली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात होऊनदेखील इंदापूर तालुक्यातील पावसाने भरलेले तलाव सध्या कोरडे पडले आहेत.

अकोले : यंदा डिसेंबर महिना सुरू होण्याअगोदरच ग्रामीण भागातील दुष्काळाची छाया गडद होऊ लागल्ली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात होऊनदेखील इंदापूर तालुक्यातील पावसाने भरलेले तलाव सध्या कोरडे पडले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे पाणीउपसा करण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे गावोगावी पाहायला मिळत आहे. जलउपसा करण्याच्या घटकामध्ये मोठी वाढ झाल्याचे हे परिणाम दिसून येत आहे.वाढती लोकसंख्या त्याचबरोबर पाणी वापराच्या प्रमाणातील वाढ यामुळे दिवसेंदिवस जलउपसा करण्याच्या प्रमाणात वाढ होताना जलस्रोताला बळकटी देण्याच्या प्रयत्नाला कोणी हातभार लावत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात शेती व्यवसायाला पाण्याची मोठी प्रमाणात गरज भासत असून याची गरज भागविण्यासाठी विहिरींची सोय करण्यात येत आहे.त्यामुळे ज्याप्रमाणे महसुली नोंद असलेली कुटुंबे आहेत त्यांच्याकडे सरासरी एक विहिरीची नोंद आहे. याप्रमाणे तालुक्यात विहिरींबरोबरच घरगुती पाण्याच्या वापरासाठी घरासमोर बोअरवेलची पण सोय केलेली आहे. यामुळे दिवसेंदिवस पाणी उपसा करण्याच्या घटकांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याकारणाने भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे.बंधारे झपाट्याने कोरडेचार महिन्यांपूर्वी जलयुक्त शिवाराच्या कामामुळे पाण्याने भरलेले बंधारे झपाट्याने कोरडे झाल्याचे चित्र तालुक्यातील गावोगावी पाहायला मिळत आहे. यावर्षी जास्त पाऊस होऊनदेखील पाण्याची समस्या आताच भेडसावत असल्याने अजून सहा महिन्यांत शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी जलउपसा करण्याबरोबरच शेती व्यवसायासाठी ठिबक सिंचन, शोषखड्डे यावर भर देऊन जलस्त्रोत बळकट करण्याला हातभार लावण्याची गरज आहे. जेणेकरून जलउपसा करण्याचे स्रोत दिवसेंदिवस वाढतील. त्या प्रमाणात पाणीबचत करण्याची काळजी लोकांनी घेतली पाहिजे.

टॅग्स :Puneपुणे