शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

ब्राझील महोत्सवात इंदापूरचा लघुपट; देशातील विविध महोत्सवांत नोंदवला सहभाग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 13:30 IST

सोमनाथ जगताप या तरुणाने दिग्दर्शित केलेला ‘जिव्हाळा : एक विलक्षण नातं’ हा लघुपट. त्याची नुकतीच ब्राझील येथे होणाऱ्या ‘इकोे फिल्म फेस्टिव्हल’साठी निवड झाली आहे. 

ठळक मुद्देनीरा नदीकाठी वसलेल्या नीरा नरसिंगपूर येथे ६ दिवसांच्या कालावधीत लघुपटाचे चित्रीकरण पूर्णहरवण्याच्या मार्गावर असलेल्या माणुसकीच्या नात्यावर टाकण्यात आला प्रकाश

दीपक कुलकर्णी । पुणे : चित्रपट या माध्यमाला काळ, प्रांत, भाषा आणि जात यांच्या मर्यादेची चौकट लागू होत नाही. त्यात चित्रपट असो वा लघुपट. या प्रकारात निर्माण होणाऱ्या कलाकृती रुपये आणि प्रसिद्धी यांच्यापेक्षा आशयसंपन्नतेने महत्त्वाच्या ठरतात. कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या अफलातून जमलेल्या भट्टीमुळे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. अशीच एक कलाकृती म्हणजे सोमनाथ जगताप या तरुणाने दिग्दर्शित केलेला ‘जिव्हाळा : एक विलक्षण नातं’ हा लघुपट. त्याची नुकतीच ब्राझील येथे होणाऱ्या ‘इकोे फिल्म फेस्टिव्हल’साठी निवड झाली आहे. द गोल्ड पिरॅमिड पिक्चर्स आणि ग्रीन वूड क्रिएशन यांची निर्मिती असलेल्या इंदापूरच्या सोमनाथ जगतापने इंदापूरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी लघुपटाची कथा लिहीत असतानाच आपली कलाकृती परदेशी पाठविण्याचे स्वप्न पाहिले. ते पूर्ण करण्यासाठी इंदापूर ते मुंबई अशी कलाकार आणि तंत्रज्ञ यांची उत्तम टीमची सांगड घातली. नवख्या व काही अनुभवी कलाकारांना सोबत नीरा नदीच्या काठावर वसलेल्या नीरा नरसिंगपूर येथे सहा दिवसांच्या कालावधीत लघुपटाचे चित्रीकरण पूर्ण केले.  या लघुपटाने पुणे, नाशिक, आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात सहभाग नोंदविला. पुढे या कलाकृतीला परदेशी पाठविण्यासाठी संपूर्ण टीमची धडपड सुरु होती. पुढच्या प्रवासाबद्दल सर्व टीमच्या मनात प्रश्नचिन्ह होते. या सोशल मीडियाचा पर्याय त्यांच्या मदतीला धावून आला. या पर्यायाने त्यांना सात ते आठ असे विविध देशांतील लघुपट महोत्सवाचे दालन खुले करून दिले. यामध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जी २ ग्रीन अर्थ फिल्म फेस्टिव्हल’च्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारण्यापर्यंत या लघुपटाने यश मिळविले.एक महिन्याच्या कालावधीतच पुन्हा एकदा हा लघुपट ब्राझील येथे होणाऱ्या इको फेस्टिव्हलसाठी निवडण्यात आला. वीस मिनिटांच्या या लघुपटात शहर व ग्रामीण भागात हरवण्याच्या मार्गावर असलेल्या माणुसकीच्या नात्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. रक्ताच्या नात्यांपेक्षासुद्धा कधी कधी अनोळखी नाते आयु्ष्यात गरजेच्या वेळेला उपयोगात येतात. प्रेमाच्या पलीकडचे विलक्षण नातं या लघुपटात दिग्दर्शक आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या लघुपटात यश वरेकर, शिवानी शिंदे, मिलिंद शिळीमकर, स्वप्नील कुलकर्णी, सौरभ जाधव, आकाश करे आदींनी भूमिका साकारल्या आहे. या लघुपटाचे संगीत मुंबईच्या मंदार पाटील यांनी दिले आहे. छायांकन पिनू जगताप आणि ओंकार मारणे तर वेशभूषा छाया शिंदे यांची आहे.

ब्राझीलपर्यंतचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. परंतु या प्रवासाने खूप काही गोष्टी शिकविल्या. तसेच प्रेरणाही दिली. ग्रामीण पातळीपासून जपलेली चित्रपट या क्षेत्राची आवड मनाला समाधानकारक आहे. पण या कामासाठी संपूर्ण टीमने घेतलेल्या अतोनात मेहनतीमुळेच यश मिळाले आहे. या लघुपटासाठी महेश कोकाटे, डॉ. अमित कांबळे, सुशील महाजन, रेश्मा शिंदे आदींचे खूप सहकार्य लाभले. - सोमनाथ जगताप, दिग्दर्शक 

टॅग्स :cinemaसिनेमाPuneपुणे