शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्यातील शेततळे कोरडे ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:28 IST

वालचंदनगर : तळे कोरडे पडल्याने बागायती शेतीला धोका

वालचंदनगर : परिसरातील विहिरी व विंधनविहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने शेतकऱ्यांबरोबरच सामान्य जनतेलाही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. गेल्या काही दिवसांत होत असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यात थैमान घातले आहे. परंतु इंदापूर तालुक्यातील शेतकºयांना वरदान ठरलेले शेततळे पावसाअभावी कोरडे पडले आहे. या शेततळ्याच्या विश्वासार्हताने हजारो हेक्टर फळबागांची लागवड करण्यात आलेली आहे. तळ्यातच नाही तर मळ्यात येणार कुठून, या म्हणीप्रमाणे हजारो हेक्टर द्राक्षे, डाळींब, पपई, ऊस, बागायती शेतीला धोकादायक ठरत आहे. शेततळ्यात पाणीच नसल्याने शेतकऱ्याने केलेले आर्थिकदृष्ट्या खर्च व कष्ट वाया जाणार असून, पुन्हा शेतकºयांना दुहेरी संकटाचा सामना करण्याची वेळ ओढवलेली आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सर्वच तालुक्यांच्या मानाने सर्वांत जास्ती शेततळी आहेत. शेतकºयाने शेतीला पाणीपुरवठा योग्य व व्यवस्थितपणे होण्यासाठी व दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे व ड्रीप या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेकडो एकर जमिनीवर शेततळे उभारण्यात आलेले आहेत. बहुतेक शेतकºयांना शेततळे देण्यात आलेले असून, अनुदानसहित मंजूर करण्यात आलेले आहेत. असंख्य शेतकºयांनी आपल्या स्वखर्चात एक एकर दोन एकरात शेततळी उभारली आहेत . परंतु विहिरी, विंधनविहिरीच्या पाण्याच्या पातळीत पावसाअभावी कमालीची घट झालेली असल्याने वरदान ठरलेले शेततळे शेतकºयांच्या बागांसाठी सध्यातरी शाप ठरलेले दिसत आहे. तालुक्यातील फळबागा जळून जात असल्यामुळे विहिरीत व विंधनविहिरीत पाणीच उपलब्ध नसल्याने शेततळ्याच्या विश्वासावर अवलंबून असणाºया शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या फटका बसला आहे. 

टॅग्स :IndapurइंदापूरPuneपुणे