शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरला बळीराजा चिंतेत, शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:52 IST

रविवार व सोमवारी इंदापूर तालुक्यात कडक ऊन होते; मात्र पाऊस न पडल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. शेतक-याची ग्रामीण भागात एक म्हण आहे की, भाद्रपद महिन्यात कडक ऊन पडल्यास पाऊस पडतो.

पळसदेव - रविवार व सोमवारी इंदापूर तालुक्यात कडक ऊन होते; मात्र पाऊस न पडल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. शेतक-याची ग्रामीण भागात एक म्हण आहे की, भाद्रपद महिन्यात कडक ऊन पडल्यास पाऊस पडतो; मात्र पाऊस नाही प्रचंड उकाडा मात्र निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतातील पिके धोक्यात आली आहेत.तलाव कोरडे, पाऊस नाही, विहिरींची पाणीपातळी कमी होत आहे. अशा तिहेरी मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. एकीकडे खडकवासला कालवा व नीरा डाव्या कालव्याच्या पाण्यावरून सत्ताधारी व विरोधक नेत्यांमध्ये राजकारण सुरू आहे; मात्र तलावांमध्ये अद्याप पाणी आलेले नाही. काहीही होवो आमच्या पाझर तलावांमध्ये पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. बाजरी पीक तर जळून गेले, आता उसाचे काय होणार, अशी चिंता शेतकºयांना वाटू लागली आहे. एकीकडे हुमणी सारख्या रोगाने उसाला संपूर्ण ग्रासले आहे. औषधे फवारणी करून ही हुमणी आळी नष्ट होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पाऊस नसल्याने अनेक मेंढपाळांचे कळप चाºयाच्या शोधार्थ भटकंती करत आहेत.पाण्याच्या प्रश्नावर प्रथमच इंदापूर तालुक्यात असे एवढे वाईट दिवस आले नव्हते; मात्र चार वर्षांत शेतकºयांची हेटाळणी म्हणायची की दोष, अशी चर्चा सुरू आहे, दरम्यान शेतकºयांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.पाण्याचे राजकारण नको : नागरिकांची अपेक्षाइंदापूर तालुक्यातील राजकारण दूषित - दौंड तालुक्याच्या राजकारणानंतर इंदापूर तालुक्यात राजकारण सुरू आहे. विशेषत: पाणप्रश्नावर आमदार व माजी मंत्री यांची जुगलबंदी चालते; मात्र जनतेच्या पदरात काहीच पडत नाही. याच्या अगोदर अनेक नेते मंडळी आमदार होऊन गेले. त्यामधे कै. शंकरराव पाटील, कै. राजेंद्र कुमार घोलप, कै. गणपतराव पाटील या माजी आमदारांनी राजकारण विरहित कार्य केले. सध्याचे राजकारण मात्र वेगळे सुरू असल्याचे वयोवृद्ध नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस