शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

बॉम्बने उडविण्याच्या वाढल्या धमक्या

By admin | Updated: January 3, 2017 06:25 IST

हाणामारी, तसेच खुनासारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी घटनांमध्ये दगडांचा वापर होत असतो. चाकू, तलवारी, गुप्ती या हत्यारांचाही वापर आरोपींकडून केला जात आहे

पिंपरी : हाणामारी, तसेच खुनासारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी घटनांमध्ये दगडांचा वापर होत असतो. चाकू, तलवारी, गुप्ती या हत्यारांचाही वापर आरोपींकडून केला जात आहे. अलीकडच्या काळात गावठी कट्टा अथवा बिगरपरवाना पिस्तुलाचाही सर्रास वापर होत आहे. धारदार शस्त्र अथवा पिस्तुलाच्या धाकाने धमकावण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. आता तर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्याचे प्रकार शहरात घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोणाला भंगार मालाच्या साठ्यात, तर कोणाला कचऱ्यात लष्करातील स्फोटके, बॉम्बसदृश वस्तू आढळून येऊ लागल्या आहेत. विश्वनाथ गणपती साळुंखे (वय ५६ , रा. औदुंबर कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) या आरोपीने तर घरकाम करणाऱ्या महिलेला बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी दिली. त्यानुसार झडती घेतली असता त्याच्या घरात चक्क बॉम्बसदृश वस्तू आढळून आली. वर्षभरापूर्वी काळेवाडीत, थेरगाव येथे तरुणांकडे बॉम्बसदृश वस्तू सापडल्या होत्या. देहूरोडमध्ये भंगारमालात आढळून आलेल्या वस्तूंचा स्फोट घडल्याच्या घटनांची नोंद आहे. अशा प्रकारे स्फोटके कोठेही आढळून येण्याचे प्रकार गंभीर असून, त्यातून सार्वजनिक सुरक्षिततेला धोका पोहोचू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. गतवर्षी चऱ्होली खुर्द येथे रस्त्याचे काम सुरू असताना एका पोत्यात चार बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्या होत्या. पोलीस, बॉम्बशोधक-नाशकपथक आणि खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीच्या पथकाकडून या वस्तूंची पाहणी करण्यात आली. आळंदी-मरकळ रस्त्यावरून चऱ्होली खुर्द गावाकडे जाण्यासाठी ठेकेदारामार्फत रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना रस्त्यात येणाऱ्या एका झाडाजवळ पोत्यामध्ये काही तरी असल्याचे कामगारांनी पाहिले. त्यांनी उघडून पाहिले असता, त्यामध्ये चार बॉम्बसदृश वस्तू असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर काळेवाडीत एका तरुणाच्या घरात त्याने बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याचे निदर्शनास आले होते. थेरगावातही बॉम्बसदृश वस्तू बाळगणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. (प्रतिनिधी)