शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

झोपडपट्ट्यांचे वाढते अतिक्रमण, घाणीच्या साम्राज्यात मूलभूत गरजाही अपूर्ण, यंत्रणेला अपयश, पुनर्वसनानंतरही ताबे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 03:28 IST

पर्वती टेकडी परिसरातील अंदाजे ११० एकरमध्ये वसलेल्या जनता वसाहतमध्ये आजही नवीन झोपड्या तयार होत आहेत. जे नागरिक येथे राहतात त्यांच्या मूलभूत गरजाही येथे पूर्ण होत नाहीत.

- गौरव कदमसहकारनगर : पर्वती टेकडी परिसरातील अंदाजे ११० एकरमध्ये वसलेल्या जनता वसाहतमध्ये आजही नवीन झोपड्या तयार होत आहेत. जे नागरिक येथे राहतात त्यांच्या मूलभूत गरजाही येथे पूर्ण होत नाहीत. घाणीच्या साम्राज्यात ते राहत असताना वाढतच जाणाºया अतिक्रमणाला थांबविणे शासकीय यंत्रणेला शक्य होत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. जनता वसाहतीची सध्या ६० ते ७० हजार लोकसंख्या असल्याचे सांगण्यात येते.पुण्याच्या पर्वती परिसरात १९७५ साली आसपासच्या गावांमधील गरजू नागरिकांनी रोजगारासाठी प्रवेश केला. रस्त्यावर झोपता झोपता ऋतूचक्रापासून बचाव म्हणून झोपड्या बांधण्यास सुरुवात झाली. पर्वती पुण्याचा सांस्कृतिक वारसा असलेले ठिकाण होते. त्याच वारशाच्या आजुबाजूला जनता वसाहत नावाने मोठी झोपडपट्टी वसण्यास सुरुवात झाली. गरज आणि गरिबी आंधळी असते, असे म्हणतात.येथील नागरिकांना स्वत:चे हक्काचे घर मिळावे, यासाठी वाल्मीकी आवास योजना, घरकुल योजना अशा पद्धतीच्या शासकीय योजना राबविल्या जाव्यात, अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली. नागरिकांची त्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. वसाहतीमध्ये सुविधा खर्च नाही. पक्क्या घरात, इमारतींमध्ये गेल्यास खर्च वाढेल, अशी अनेक नागरिकांची मानसिकता आहे. काही नागरिकांकडे पैसे असूनही जागेवरील हक्क जाईल, या भीतीने ते जागा सोडत नाहीत. अनेक नागरिकांनी चढ्या भावाने घरे विकली अथवा भाड्याने दिली आहेत. अनेक कुटुंबांना वा विद्यार्थ्यांना कमी भाड्यात जागा मिळत असल्याने येथे आश्रय घेतला जातो. काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे वातावरण दूषित होऊन युवावर्ग भुरट्या चोºयांकडे वळत आहे. नागरिकांनी पुढील पिढी संस्कृत, शिक्षित असावी, यासाठी योग्य पर्याय निवडून विरोधाला विरोध न करता शासकीय योजनेशी समतोल राखत पुढाकार घेऊन योग्य पर्याय निवडणे गरजेचे आहे.स्वच्छतागृहांमध्ये घाणस्वच्छतेबाबत जनजागृती नसल्याने वसाहतीमध्ये अनेक जागी खुल्यावर शौच केले जाते. जागोजागी गुटखा खाऊन थुंकलेल्यांमुळे पिचका-या पाहण्यास मिळतात. शासकीय स्वच्छतागृहांमध्ये कही खुशी कही गम अशी अस्वछतेची भयानक परिस्थिती पाहण्यास मिळते. जनता वसाहतीमधील कचरा घाण पावसामुळे शेजारील कालव्यात जात आहे. हे सर्वच नागरिकांना पुढे धोकादायक व आजारी पडण्यास कारणीभूत ठरते. कालव्याच्या बाजुस सुरक्षा जाळी बसविली असली तरी कपडे-भांडी धुण्याचे काम कालव्यातच केले जाते. सांडपाणी वाहिनीचे योग्य नियोजन वसाहतमध्ये होणे गरजेचे आहे.जनता वसाहतीमध्ये नागरिकांना स्वच्छतेबाबत जनजागृती होणे, होणाºया आजारांचे मुख्य कारण समजणे गरजेचे आहे. वसाहतीमध्ये शासकीय पातळीवर औषध फवारणी, संसर्गजन्य रोगांची माहिती पुरविणे गरजेचे आहे. थंडीच्या दिवसांत अनेक जागी गाडीचे टायर सर्रास जाळले जातात. पर्वतीवरून सकाळी जनता वसाहतमधून मोठ्या प्रमाणात निघणाºया धुराचे दर्शन होते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषणपाहावयास मिळते.

टॅग्स :Puneपुणे