शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आशियात चीन दबदबा वाढवतोय - डॉ. रॉजर लिऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 03:49 IST

‘चीनचा झपाट्याने आर्थिक विकास होत आहे. साऊथ एशियामधील छोट्या देशांना कर्जरूपी मदत करून, त्यांच्यावर चीन प्रभाव टाकत आहे. ‘वन बेल्ट -वन रूट’ प्रकल्पातून भविष्यात चीनला वेगवान विकास साधायचा आहे. याचेच धोरण म्हणून चीन श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात मदत करत असून...

पुणे : ‘चीनचा झपाट्याने आर्थिक विकास होत आहे. साऊथ एशियामधील छोट्या देशांना कर्जरूपी मदत करून, त्यांच्यावर चीन प्रभाव टाकत आहे. ‘वन बेल्ट -वन रूट’ प्रकल्पातून भविष्यात चीनला वेगवान विकास साधायचा आहे. याचेच धोरण म्हणून चीन श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात मदत करत असून, तेथील बंदराचा विकास करण्यात येत आहे,’ असे मत तैवान येथील प्रा. डॉ. रॉजर लिऊ यांनी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग, तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर आॅफ नॅशनल सिक्युरिटी आणि डिफेन्स अ‍ॅनालिसीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्ट्रॅटेजिक रिलेव्हन्स आॅफ चायना इन साऊथ एशिया’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या विषयावर मार्गदर्शन करताना लिऊ बोलत होते. या वेळी संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विजय खरे, लेफ्टनंट जनरल चव्हाण तसेच विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.लिऊ म्हणाले की, चीनच्या अनेक प्रातांचा जीडीपी हा काही विकसित देशांएवढा आहे. भविष्यात विकासाचा वेग वाढवण्यासाठी तसेच संपूर्ण जगात आपला प्रभाव पाडण्यासाठी आज चीन अनेक प्रकल्प राबवित आहेत. साऊथ एशियामधील अनेक छोट्या देशांना मोठी कर्ज देऊन तेथील बंदरांचा विकास चीन करत आहेत. भारताला हे धोरण न पटण्यासारखे आहे. चीन सध्य श्रीलंकामधील हंबनतोटा बंदराचा विकास करत आहे. श्रीलंकेसोबत संबंध सुधारण्यावर चीन भर देत आहे. भारताला ही बाब चिंताग्रस्त करणारी आहे. चीनच्या या धोरणाला प्रत्युत्यतर देण्यासाठी भारतानेही पावले उचलली आहेत. मात्र, अनेक धोरणे राबविताना भारत हा साशंक असतो. भविष्यात चीनच्या धोरणाला शह देण्यासाठी जपानची मदत भारत घेऊ शकतो. सध्या साऊथ चायना समुद्रातील देशांशीही संबंध सुधारण्यावर भर देत आहे.

टॅग्स :Puneपुणे