शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानाविषयी वाढतेय जागृती; ससूनमध्ये यकृत व नेत्रदान यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 21:42 IST

ब्रेन डेड घोषित केलेल्या ६१ वर्षीय महिला रूग्णाचे यकृत व नेत्र पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार घेणार्‍या रूग्णांना दान ससून रूग्णालयात करण्यात आले. 

ठळक मुद्देअवयव दान करण्यासाठी रूग्णाच्या नातेवाईकांमध्ये जागृती करण्याचे प्रमाण वाढत आहे.गेल्या दोन वर्षात मेंदू मृत झालेल्या रूग्णांचे एकूण १२ अवयवांचे दान करण्यात ससून रूग्णालयाच्या प्रशासनाला यश आले.

पुणे : ससून रूग्णालयात ब्रेन डेड घोषित केलेल्या ६१ वर्षीय महिला रूग्णाचे यकृत व नेत्र पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार घेणार्‍या रूग्णांना दान करण्यात आले. खासगी रूग्णालयासोबतच आता ससून सारख्या सरकारी रूग्णालयामध्ये देखील अवयव दान करण्यासाठी रूग्णाच्या नातेवाईकांमध्ये जागृती करण्याचे प्रमाण वाढत आहे. बिबवेवाडी येथील महिला रूग्णाच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे बुधवारी (दि. ११) ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससूनच्या ट्रॉमा अतिदक्षता विभागातील डॉक्टर व समाजसेवकांनी नातेवाईकांचे प्रबोधन केले. त्यानंतर नातेवाईक महिलेचे यकृत व नेत्रदान करण्यास तयार झाले. ससून रुग्णालयातील डॉ. हर्षल राजशेखर, डॉ. मंदार धामनगावकर, डॉ. हरिश्चंद्र उम्रजकर आणि भूलतज्ज्ञ डॉ. संयोगिता नाईक यांनी महिला रूग्णाचे यकृत व नेत्राचे गरजू रुग्णांना त्याचे दान करण्यात आले. डॉ. हरिष टाटीया व वैद्यकीय समाजसेवक अधिक्षक अर्जूून राठोड यांनी डेड. टी. सी. सी. व रूग्णाचे नातेवाईक व अन्य सर्व यंत्रणेशी समन्वय साधून अवयव यशस्वी केले.ससूनमार्फत आतापर्यंत १२ अवयवांचे दान            शासनाच्या महाअवयवदान जनजागृती अभियानामुळे समाजामध्ये अवयवदानाचा सकारात्मक संदेश मोठ्या प्रमाणावर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षात ससून रूग्णालयामधून मेंदू मृत झालेल्या रूग्णांचे एकूण १२ अवयवांचे दान करण्यात ससून रूग्णालयाच्या प्रशासनाला यश आले आहे. ससून रूग्णालयाची सध्या सुपर स्पेशालिटी रूग्णालय म्हणून  ओळख वाढत आहे. - डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता ससून रूग्णालय

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य