शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचा भाव वधारल्याने आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 02:33 IST

कांदा उत्पादकांना अच्छे दिन; दोन महिने उकिरड्यावर फेकल्यावर कांदा पुन्हा बाजारात

मंचर : कांद्याच्या भावात काहीशी वाढ झाल्यानंतर मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याची विक्रमी आवक झाली आहे. तब्बल ५५ हजार पिशवी कांदा विक्रीसाठी आल्याने बाजार समिती आवारात माल ठेवण्यास जागा राहिली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा माल वाहनातच राहून वाहतूक कोंडी झाली होती. सकाळी सुरू झालेला लिलाव सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होता.कांद्याचे ढासळलेले बाजारभाव सुधारत आहे. २ महिने कांद्याला बाजारभाव नव्हता परिणामी शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. काही शेतकऱ्यांनी कांदा शेतातच सोडून दिला. तर उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ शेतकºयांवर आली होती. १५ दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात काहीशी वाढ झाली. मंगळवारी झालेल्या लिलावात कांदा १० किलोस ९० रुपये या भावाने विकला गेला. बाजारभाव वाढू लागल्याने शेतकºयांनी तत्परतेने कांदा शेतातून काढून तसेच साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढला. त्यामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाली. तब्बल ५५ हजार पिशवी कांदा विक्रीसाठी आला. हा आतापर्यंतचा उच्चांक असल्याची माहिती विक्रेते बाळासाहेब बाणखेले यांनी दिली. मागील लिलावाला २२ हजार पिशवी आवक होवून ९० रुपये भाव मिळाला होता. बाजार समितीचा आवार, तरकारी मार्केट, कांदा पिशव्यांनी भरुन गेला होता.शेडमध्ये जागा कमी पडल्याने अगदी रस्त्यावर कांदा ठेवण्यात आला होता. जागा मिळेल तेथे शेतकरी त्यांचा कांदा ठेवत होते. आंबेगाव तालुक्याबरोबरच शिरुर, खेड या तालुक्यातील आवक झाली होती. दुपारी जागा उपलब्ध नसल्याने कांदा ट्रॅक्टर, पिकअप, टेम्पो या वाहनातच ठेवण्याची वेळ आली. परिणामी बाजार समितीत वाहतुक कोंडी झाली होती. ती सुरळीत करताना सुरक्षा रक्षकांची दमछाक होत होती.दहा किलोलो ८५ रुपयेबाजार समितीत ३० आडते असून १५ खरेदीदार आहेत.सकाळी ११.३० वा.लिलावाला सुरुवात झाली. आवक भरपूर असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत लिलाव सुरु होते. चांगला कांदा ८५ रुपये १० किलो या भावाने विकला गेला. बदला १० ते २० रुपये,गोळी कांदा २० ते ४० रुपये या भावाने विकला गेला. येथील कांदा निर्यात केला जातो तसेच दिल्ली व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हा कांदा प्रामुख्याने पाठविला जातो. कांद्याचे बाजारभाव वाढल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. शेतकरी कांद्याचे भाव अजुन वाढण्याच्या प्रतिक्षेत आहे.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी