शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

पीएमपीच्या उत्पन्नात वाढ, कामकाजात सुधारणेमुळे वाढली प्रवाशांची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:57 IST

पुणे : शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेलल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कामकाजात मागील काही महिन्यांपासून अनेक सुधारणा झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

पुणे : शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेलल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कामकाजात मागील काही महिन्यांपासून अनेक सुधारणा झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. बस संचनलासह विविध कारणांमुळे पीएमपीच्या उत्पन्नात आणि प्रवाशांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत हे उत्पन्न सुमारे १२ कोटींनी वाढले असून मागील पाच वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दिली. ‘पीएमपी’विषयी महापालिकेने बोलावलेल्या खास सर्वसाधारण सभेमध्ये मुंढे यांनी पीएमपीचा लेखाजोखा सादर केला. त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी एप्रिल ते आॅक्टोबर या महिन्यामध्ये पीएमपीला सुमारे ३०९ कोटी ३ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. यावर्षी याच कालावधीत मिळालेले उत्पन्न सुमारे ३२१ कोटी ५४ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या कालावधीत मिळालेल्या उत्पन्नामध्ये सुमारे १२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या कालावधीत प्रतिदिन सरासरी १ कोटी ५० लाख रुपये उत्पन्न दिसून येते.यावर्षी सप्टेंबर व आॅक्टोबरचे वाहतूक उत्पन्न मागील ५ वर्षांतील उत्पन्नापेक्षा जास्त आहे. आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यातील प्रतिबस उत्पन्न मागील पाच वर्षांपेक्षा जास्त आहे. सप्टेंबर २०१७ ची प्रवासी संख्याही मागील पाच वर्षांपेक्षाजास्त आहे.२०१६-१७ मध्ये मार्गावरसरासरी १३८३ बस होत्या. नोव्हेंबर २०१७ मध्ये ही सरासरी १४७२ एवढी आहे. बसेसच्या संचलनामध्येही मागील ७ ते ८ महिन्यांत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एप्रिल ते आॅक्टोबर २०१६ अखेरीस बसेसचे सरासरी संचलन सुमारे ६ कोटी ४१ लाख किलोमीटर होते. तर यावर्षी याच कालावधीत हे संचलन सुमारे ६ कोटी ७१ लाख किलोमीटरपर्यंत पोहचले आहे.पीएमपीच्या मालकीच्या बसचे सुमारे ४० लाख ३० किलोमीटर संचलन अधिक झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पीएमपीच्या मालकीच्या बसचे संचलन वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. खासगीबस ठेकेदारांच्या बसेसचे संचलन एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत मागीलवर्षीच्या तुुलनेत सुमारे ९ लाख १० हजार किलोमीटरने कमी झाले आहे. त्यामुळे अधिक संचलनामुळे ठेकेदारांना द्यावी लागणारी रक्कम कमी झाली आहे.>मार्गांचे सुसूत्रीकरण करण्यात आले असून३७४मार्गांमधील अनेक तोट्याचे मार्ग बंद करून ते२५३पर्यंत खाली आणले आहेत. तर सुमारे३५नवीन मार्गही सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळेही उत्पन्नात वाढ झाली असून अतिरिक्त खर्च कमी झाला आहे.>विविध कारणांसाठी खासगी बस ठेकेदारांना२०१६-१७मध्ये २१ कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला होता.यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत त्यामध्ये दुपटीहून अधिक वाढ झाली असून४८ कोटी ६१ लाखरुपये दंडआकारण्यात आला.>ठळक मुद्देआॅक्टोबर २०१६ अखेर उत्पन्न३०९ कोटी ३ लाख ४९ हजार ४९८आॅक्टोबर २०१७ अखेर उत्पन्न३२१ कोटी ५४ लाख २६ हजार ४३८>बसचे संचलनएप्रिल ते आॅक्टोबर २०१६ अखेर६ कोटी ४१ लाख ५५ हजार ४८२एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ अखेर६ कोटी ७१ लाख ५७ हजार ६६७प्रवासी केंद्रीत बदल‘पीएमपी’मध्ये प्रवासी केंद्रीत बदल केले जात आहेत. अधिकाधिक बस मार्गावर आणण्यासाठी देखभाल-दुरूस्तीचे कामात महत्त्वाचे बदल करण्यात आला आहे. रात्रपाळी सुरू करण्यात आल्याने दिवसभर मार्गात अधिक बस मिळत आहेत.ब्रेकडाऊनचे प्रमाण ३५० वरून ९० पर्यंत कमी झाले असून ते एक टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा प्रयत्न आहे. मार्गांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. अशा विविध कारणांमुळे उत्पन्न व प्रवाशांमध्येही वाढ झाली असल्याचे मुंढे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे