शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात वाढतीये वाहतूकीचे नियम माेडणाऱ्यांची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 12:48 IST

पुण्यातील वाहनसंख्येबराेबरच नियम माेडणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत अाहे. पुण्यातील वानवडी, सांगवी, हिंजवडी या भागांमध्ये वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन जास्त प्रमाणात हाेत असल्याचे पाेलिसांनी दिलेल्या अाकडेवारीतून समाेर अाले अाहे.

पुणे : दिवसेंदिवस पुण्यातील वाहनांची संख्या वाढत असताना, अाता नियम माेडणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत अाहे. ई-चलन, सीसीटिव्ही, वाहतूक पाेलीस यांच्यामाध्यमातून वाहतूकीला शिस्त लावण्याचा वाहतूक शाखा प्रयत्न करत असली तरी काही बेजबाबदार वाहनचालकांवर त्याचा कुठलाही परिणाम हाेत नसल्याचे दिसून येत अाहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते मार्च 2018 या कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये वानवडी भागात सर्वाधिक वाहनचालकांनी नियमभंग केल्याचे समाेर अाले अाहे.     पुण्यातील वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस जटील हाेत चालली अाहे. वाहनसंख्या वाढल्यामुळे पार्किंगचाही माेठा प्रश्न निर्माण झाला अाहे. सकाळी व संध्याकाळी शहरातील वाहतूक काेंडीला पुणेकर कंटाळले असताना या नियम माेडणाऱ्यांकडून वाहतूक काेंडीत भर पडत अाहे. वाहतूक पाेलिसांनी दिलेल्या अाकडेवारीनुसार जानेवारी ते मार्च 2018 या कालावधीत वानवडी भागात नियम माेडणाऱ्या 15 हजार 64 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या खालाेखाल सांगवी येथे 14 हजार एकशे 72 तर हिंजवडी येथे 9 हजार सातशे 68 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली अाहे. विशेष म्हणजे ज्या भागात सर्वात जास्त वाहतूकीचे नियम माेडल्याची प्रकरणे समाेर अाली आहेत, ते भाग पुण्यातील सुशिक्षित नागरिकांचे भाग म्हणून अाेळखले जातात.     वाहतूकीचे नियम ताेडणाऱ्यांच्या वाढत्या संख्येबराेबरच बेशिस्त पार्किंगचा प्रश्नही पुणेकरांना सतावताेय. शहरातील बहुतांश रस्त्यांवर बेशिस्तपणे केलेली पार्किंग अाढळून येते. त्यामुळे वाहतूक काेंडीची समस्य उद्भवत असते. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी तसेच वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करु नये असे अावाहन पुण्याचे वाहतूक उपायुक्त अशाेक माेराळे यांनी केले अाहे. 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस