शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

मोबाइलमुळे स्वमग्नतेमध्ये वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 03:00 IST

मोबाइल ही आजच्या धावपळीच्या जीवनातील अत्यावश्यक वस्तू बनली आहे, मात्र या मोबाइलच्या अति वापरामुळे स्वमग्न (आॅटिझम) असलेल्या मुलांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे. स्वमग्न मुलांच्या संख्येत वाढ होत असताना याबाबत मोठयाप्रमाणात जनजागृती होण्याची आवश्यकता या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे  - मोबाइल ही आजच्या धावपळीच्या जीवनातील अत्यावश्यक वस्तू बनली आहे, मात्र या मोबाइलच्या अति वापरामुळे स्वमग्न (आॅटिझम) असलेल्या मुलांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे. स्वमग्न मुलांच्या संख्येत वाढ होत असताना याबाबत मोठयाप्रमाणात जनजागृती होण्याची आवश्यकता या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.भारतामध्ये पूर्वी एक हजारांमागे एक स्वमग्न मूल आढळून येत होते आता हीच संख्या अडीचशे मुलांमागे एक स्वमग्न मूल इतकी वाढलेली आहे. अमेरिकेमध्ये हेच प्रमाण ६८ मुलांमागे १ मूल इतके आहे. आनुवांशिकता, वाढते प्रदूषण, जंक फूड, उशीराने होणारी लग्ने आदी कारणांमुळे स्वमग्न मुलांचा जन्म होत असल्याचे संशोधनामध्ये आढळून आले आहे. सध्या मोबाइल व विविध प्रकारच्या गॅझेटचा होणारा अति वापर यामुळेही स्वमग्न मुलांचा जन्म होत असल्याचे संशोधनात दिसून आले असल्याची माहिती प्रसन्न आॅटिझम सेंटरच्या कार्यकारी संचालक व मानसोपचार तज्ज्ञ साधना गोडबोले यांनी दिली.स्वमग्नता (आॅटिझम) याविषयी आहे आजही अनेकांना फारशी माहिती नाही.स्वत:च्याच विश्वात, विचारात रमणे म्हणजे स्वमग्नता. ही स्वमग्न मुले नेहमी समाजापासून, अवतीभवतीच्या वातावरणापासून अलिप्त राहतात. त्यांना भांषा संप्रेषणाची मोठी समस्या असते. बाहय जगाशी, परिसराशी संबंध कोणताही संबंध नसल्यासारखी मुले वावरतात. दोन वर्षांचे मूल.. शारीरिकदृष्ट्या काहीच वैगुण्य नाही, पण बोलणे कमी, एकटेच राहणे, फार मऊ किंवा फार खडबडीत स्पर्श नकोसा वाटणे, शून्यात नजर लावून बसणे, चिडचिड करणे, उगीचच रडणे अशी लक्षणं दिसली की बहुदा पालक आपलं बाळ मुडी आहे किंवा हट्टी आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र ही लक्षणं आपलं मूल स्वमग्न असल्याचे त्यांच्या खूप उशीरा लक्षात येते. अनेकदा मतिमंदत्व व स्वमग्नता यातील फरक समजत नाही. स्वमग्न मुलांना मतिमंद मुलांच्या शाळेत पाठविले जाते. मात्र मुलांसाठी स्वतंत्र उपचार पध्दतीचा अवलंब करणे आवश्यक असते. विशेष शिक्षण, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, आॅक्युपेशनल थेरपी, म्युझिक थेरपी, डान्स थेरपी तसेच ड्रामा थेरपीनुसार मुलांना शिकविणे आवश्यक असते. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद अशी मोठी शहरे वगळता आजही अनेक ठिकाणी स्वमग्न मुलांसाठी स्वतंत्र शाळांची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना ससेहोलपट करावी लागत आहे.स्वमग्नतेची प्रमुख लक्षणेस्वमग्न असणे, सतत एकच वर्तन करणे (उगीचच हात हलवणे, गोल फिरणे वगैरे), सतत रडणे वा हसणे किंवा क्षणात हसणे वा रडणे, एखादा शब्द किंवा वाक्य सतत बोलत राहाणे, वास्तवातील गोष्टींची कल्पना करू न शकणे, पण कल्पनाशक्ती अफाट असणे, अति अ‍ॅस्पर्नजर सिंड्रोम मुले काही कलांमध्ये निपुण असतात, चवी विषयीची आवड निवड टोकाची असणे आदी लक्षणे दिसून येतात. स्वमग्नतेची एकूण २४ लक्षणे निश्चित करण्यातआली आहेत. यातील ५ ते ६ लक्षणे स्वमग्न मुलांमध्ये दिसून येतात.

टॅग्स :Mobileमोबाइलnewsबातम्या