शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

खासगी बसच्या भाड्यात वाढ, सुट्यांमुळे प्रवासी संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:46 AM

उन्हाळा व शाळांना सुट्या लागल्या की, सणासुदीला गावाकडे जाण्याचे वेध लागतात. चार दिवस गावाकडे आनंद लुटण्यासाठी, तर मामाच्या गावची मजा घेण्यासाठी, तर काही वेळा लग्नकार्यासाठी अनेक जण गावचा रस्ता धरतात.

रहाटणी : उन्हाळा व शाळांना सुट्या लागल्या की, सणासुदीला गावाकडे जाण्याचे वेध लागतात. चार दिवस गावाकडे आनंद लुटण्यासाठी, तर मामाच्या गावची मजा घेण्यासाठी, तर काही वेळा लग्नकार्यासाठी अनेक जण गावचा रस्ता धरतात; मात्र या कालावधीत प्रवासी संख्येत वाढ झाल्याचा फायदा उठवीत खासगी ट्रव्हल्स बस कंपनीच्या मालकांनी मनमानी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही मनमानी भाडेवाढ म्हणजे लूटच असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. मनमानी भाडेवाढीवर संबंधित प्रशासनाने नियंत्रण ठेवावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. असे असले, तरी प्रवासी संख्येत आणि दिवसेंदिवस वाढ होत असल्याने आणि मनमानी पद्धतीने भाडे आकारण्यात येत असल्याने खासगी बसमालकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.राज्यासह परराज्यांसाठी बसपिंपरी-चिंचवड शहरातून कोल्हापूर, लातूर, उदगीर, निलंगा, नांदेड, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ, जळगाव, भुसावळ, यावल, चोपडा, अमळनेर, धुळे, नंदूरबार, शहादा, शिरपूर, इंदूर, बºहाणपूर, सुरत यासह परराज्यांतही रोज शेकडो खासगी प्रवासी साध्या, वातानुकुलित, स्लीपर कोच यासह अनेक सुविधा असणाऱ्या बसमधून प्रवास करतात.राज्यातून व परराज्यांतून कामानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे याच भागातून राज्यातील कानाकोपºयात जाण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिकनगरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या शहरात अनेक क्षेत्रातील मोठमोठे व्यावसायिक, व्यापारीदेखील आपल्या गावी परतण्यासाठी आगाऊ ‘बुकिंग’ करीत असल्याचे खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या संचालकांकडून सांगण्यात आले. उन्हाळी सुट्या लागल्या म्हणून लगेच भाडेवाढ केली जाते असे नाही, तर ज्या आठवड्यात लग्नाच्या तारखा आहेत, हे पाहून प्रवासी भाडेवाढ केली जाते; तसेच या दिवसात शुक्रवार, शनिवार व रविवारी हमखास भाडेवाढ केली जाते. अनेकांचे कुटुंबीय गावी असतात. अनेक चाकरमाने आठवड्याच्या शेवटी गावी जातात याचाच फायदा खासगी बस मालक घेत आहेत. सध्या लग्नसराई नसल्याने काही प्रमाणात भाड्यावर अद्याप तरी अंकुश आहे; मात्र लग्नाच्या तिथी सुरू होताच भाडेवाढीचा फटका प्रवाशांना बसतो.प्रवासी भाड्यावर नियंत्रण नाही?दर वर्षी उन्हाळी सुटीत नागरिक मोठ्या प्रमाणात गावाकडे ये-जा करतात. त्यामुळे या सिझनमध्ये प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते. अनेक प्रवासी रेल्वेचे आगाऊ तिकीट बुक करून ठेवतात. काही प्रवासी एसटी बसने प्रवास करतात; मात्र सर्वसामान्य नागरिकांना, कामगार वर्गाला हे जमतेच असे नाही. त्यामुळे बहुतांशी प्रवासी ऐनवेळी खासगी बसकडे वळतात. त्याचाच फायदा घेत खासगी बसमालक अचानक भाडेवाढ करतात.अशा भाडेवाढीमुळे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. अचानक भाडेवाढ कशासाठी, अशी विचारणा केली, तर याचे काही उत्तर नसते. मग ही मनमानी भाडेवाढ का, असा संतप्त सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत. या भाडेवाढीवर नियंत्रण कोणाचे हा खरा प्रश्न आहे. अशा भाडेवाढीमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे. याकडे शासनाच्या संबंधित विभागाने लक्ष देण्याची वेळ आली आहेसध्या परीक्षांचे दिवस आहेत. काही परीक्षा सुरू असून काही संपल्या आहेत. त्यामुळे सुटी लागताच विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय गावाकडे जात आहेत. परिणामी प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रेल्वेचे आरक्षणही ‘फुल्ल’ झाले आहे. त्यामुळे कुटुंबासह प्रवास करणारे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्स बसकडे वळले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत खासगी ट्रॅव्हल्सधारकांनी प्रवासी भाड्यात मनमानी पद्धतीने भरमसाट वाढ केली आहे. परिणामी प्रवाशांना प्रवासासाठी अधिक रक्कम मोजावी लागत आहे.उन्हाळ्यात मुलांना सुटी लागली की, बहुतांश पालक बाहेरगावी जाण्याचे ‘प्लॅनिंग’ करतात. यामुळे रेल्वेचे आरक्षण तीन महिन्यांपूर्वीच ‘फुल्ल’ होऊन जाते. यामुळे प्रवासी सध्या खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला पसंती देत आहेत. राज्यातील व राज्याबाहेरील शहरांत जाणाºया खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचे दर अचानक वाढले आहेत. प्रवास सुखाचा होण्यासाठी बहुतांश प्रवासी जादा रक्कम मोजून खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करीत आहेत. अद्याप काही शाळांना सुट्या लागल्या नाहीत. तरी प्रवासी भाडे मात्र वाढविण्यात आले आहे. उन्हाळ्यात दर वर्षी १0 ते १५ टक्के आणि दिवाळीच्या सिझनमध्ये ५0 टक्क्यांवर खासगी ट्रॅव्हल्सचे प्रवासभाडे वाढविण्यात येत असल्याचे ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी सांगितले.