शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

महसूल वाढीसाठी करदात्यांची संख्या वाढवा :  चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 18:54 IST

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने उद्दीष्टापेक्षा जास्त महसूल गोळा केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देदुष्काळ निवारण, रस्ते बांधणी अशा विविध कामांसाठी हा महसूल उपयोगी पडणार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून एकूण २६ हजार ५०० कोटींचा महसूल गोळा

पुणे: राज्य कर्जबाजारी झाले असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये छापून येत असले तरी राज्य शासनाची कर्ज फेडण्याची क्षमता आहे. परंतु,कर्ज काढून राज्याचा विकास करणे हा उपाय नाही. राज्याचा महसूल चांगला असला तरी त्यात वाढ झाली पाहिजे. राज्याकडून कर भरपूर आकारला जातो, मात्र, महसूल वाढीसाठी राज्यातील करदात्यांची संख्या वाढवावी लागेल, असे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी व्यक्त केले.  राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने उद्दीष्टापेक्षा जास्त महसूल गोळा केल्याबद्दल पाटील यांच्या हस्ते विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होते. याप्रसंगी राज्याचे मुद्रांक व नोंदणी महानिरिक्षक अनिल कवडे, सहसचिव श्यामसुंदर पाटील, नैना बोंदाडे, सुरेश जाधव आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, राज्य शासनाने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला यंदा २१ हजार कोटींचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, विभागाने उद्दिष्टापेक्षा ५ हजार ५०० कोटींचा जादा महसूल गोळा केला. विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने एकूण २६ हजार ५०० कोटींचा महसूल गोळा केला. राज्य, जिल्ह्यातील दुष्काळ निवारण करण्यासाठी, बोंड आळीमुळे झालेले शेतक-यांचे नुकसान देण्यासाठी तसेच रस्ते बांधणी अशा विविध कामांसाठी हा महसूल उपयोगी पडणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाचे सर्व काम आॅनलाईन पद्धतीने केले जाते. त्यामुळे सर्व कार्यालय कॅशलेस झाले आहे.तरीही कार्यालयात कॅश कशी येते? जास्त कमाईसाठी जास्त कष्ट करा,परंतु,कार्यालयीन कामकाजात गडबड करू नका,असा सल्लाही पाटील यांनी यावेळी दिला.दरम्यान, नोंदणी व मुद्रांक विभागात मनुष्यबळाची कमतरता, रिक्त पदे, पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित आहे, असे काही अधिका-यांनी चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर विभागाचे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या दहा दिवसात स्वतंत्र बैठक घेतली जाईल, असे पाटील यांनी सांगितले. 

 

टॅग्स :PuneपुणेChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलIncome Taxइन्कम टॅक्स