शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सीएनजी दरामध्ये दीड रुपयांनी वाढ, आता पुणेकरांना प्रतिकिलोसाठी मोजावे लागणार ८५ रूपये!

By अविनाश रावसाहेब ढगे | Updated: July 9, 2024 23:54 IST

पुणे व पिंपरी चिंचवड, चाकण तळेगाव आणि हिंजवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्रीपासून दरवाढ लागू

अविनाश ढगे, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: पुणे व पिंपरी चिंचवड, चाकण तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील सीएनजीच्या दरामध्ये मंगळवारी (दि. ९) मध्यरात्रीपासून दीड रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) ने घेतला आहे. सीएनजी वाहन धारकांना आता प्रतिकिलोसाठी ८५ रूपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे वाहन धारकांच्या खिशाला काही प्रमाणात कात्री लागणार आहे.

सीएनजी गॅसची मागणी वाढत आहे. पण, स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग झाल्यामुळे सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. मागच्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या सीएनजीच्या दरात निवडणुका होताच वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. मागच्या वर्षी दोन ऑक्टोबर रोजी सीएनजीचे दर चार रुपयांनी वाढून ८७ वरून ९१ रूपये झाले होते. त्यानंतर पुन्हा एक रूपयांनी वाढ केली होती. त्यामुळे सीएनजीचे दर ९२ रुपयांवर गेले होते.

निवडणुकीच्या तोंडावर सहा मार्च रोजी सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २.५० रुपयांची कपात केली होती. आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. वाहनधारकांना मंगळवार (दि. ९) पर्यंत प्रतिकिलोसाठी ८३.५० रुपये मोजावे लागत होते. पण मंगळवारी (दि. ९) मध्यरात्रीपासून प्रतिकिलोसाठी ८५ रुपये मोजावे लागणार आहेत.

टॅग्स :Puneपुणे