शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

खाद्यतेल, साबुदाणा, साखरेच्या भावात वाढ

By admin | Updated: December 7, 2015 00:23 IST

मार्केटयार्डातील भुसार बाजारात आठवडाभरात खाद्यतेल, साबुदाणा व साखरेच्या भावात वाढ झाली. मागणीअभावी इतर वस्तूंचे भाव स्थिर राहिले.

पुणे : मार्केटयार्डातील भुसार बाजारात आठवडाभरात खाद्यतेल, साबुदाणा व साखरेच्या भावात वाढ झाली. मागणीअभावी इतर वस्तूंचे भाव स्थिर राहिले. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलांचे भाव वाढले आहेत. तसेच डॉलरची किंमत वाढल्याने त्याचा परिणाम स्थानिक बाजारातही जाणवू लागला आहे. शेंगदाणा, रिफाइंड, सूर्यफूल, पामतेल, सोयाबीन तेलामध्ये १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. साखरेच्या भावातही क्विंटलमागे ५० रुपयांची वाढ झाली. चेन्नईत झालेल्या पावसामुळे साबुदाण्याची आवक घटली आहे. परिणामी क्ंिवटलमागे ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली. नवीन ११२१, १५०९ व कोलम लचकारी तांदळाची आवक सुरू झाली असून, भाव स्थिर राहिले. डाळींचे भावही तेजीत आहेत. शेंगदाण्याची निर्यात वाढल्याने गुजरात जाडा शेंगदाण्याच्या भावात आठवडाभरात २०० रुपयांची वाढ झाली. नवीन ब्याडगी व आंध्र प्रदेशातून गुंटूर मिरचीची आवक सुरू झाली आहे.क्विंटलचे भाव : गहू : सौराष्ट्र लोकवन २५५०-३०५०, मध्य प्रदेश लोकवन २४५०-२७५०, सिहोर ३२५०-३८५०, मिलबर १८००-१८५०, ज्वारी : गावरान २९००-३५००, दुरी १९००-२१००, बाजरी महिको १८००-२०००, गावरान १६००-१८००, हायब्रीड १५००-१६००. डाळी : (प्रतिक्विंटल) : तूरडाळ- १२,००० -१७,०००, हरभरा डाळ- ६०००-६५००, मूगडाळ- १०,०००-१०,३००, मसूर डाळ- ७०००-७३००, मटकी डाळ -९८००-९९००, उडीद डाळ- १५,०००-१५,५००़कडधान्ये : हरभरा: ५८००-६०००, हुलगा: ३०००-३२००, चवळी: ५०००-६५००, मसूर: ६२००-६५००, मटकी: ७०००-९०००, वाटाणा : पांढरा २७००-२८००, हिरवा: २७००-३५००.