पुणे : शहरात सोमवारी २०२ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३३६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात १ हजार ९११ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, आजची पॉझिटिव्हची टक्केवारी ही १०.५७ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ४१४ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २५३ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर १ हजार १३१ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार १९ इतकी आहे़ आज दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला असून, यातील १ जण पुण्याबाहेरील आहे़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ५०२ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ८ लाख ४२ हजार ८७३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७२ हजार २८० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ६२ हजार ३३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================