शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

गौणखनिज दंड न भरल्यास मिळकत होणार सरकारजमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 13:34 IST

शासकीय थकबाकी न भरल्यास संबंधितांची सात-बारावरील मिळकत सरकारजमा करणार

ठळक मुद्देतहसीलदार सुनील कोळी । तलाठी व मंडलाधिकारी यांना दिल्या सूचना

उरुळी कांचन : हवेली तालुक्यात गौणखनिज उत्खनन व वाहतुकीमध्ये झालेल्या दंडात्मक कारवाईची रक्कम संबंधित व्यक्तींनी न भरल्यास संबंधितांच्या सात-बारावरील मिळकतीमध्ये इतर हक्कामध्ये दंडात्मक बोजा तलाठी व मंडलाधिकारी यांना तातडीने नोंंदविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात संबंधितांना नोटीस काढून त्यांनी शासकीय थकबाकी न भरल्यास संबंधितांची सात-बारावरील मिळकत सरकारजमा करणार असल्याची माहिती हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी दिली आहे. तालुक्यात अलीकडे गौणखनिज व वाहतुकीचा दंड झालेल्या व्यक्ती सात-बारावर शासकीय थकबाकी असताना बेकायदा हस्तांतरित करण्याचे व्यवहार होत असल्याने महसूल विभागाने तातडीने संबंधितांना नोटीस बजावून दंडाची रक्कम न भरल्यास सात-बारावरील मिळकत सरकारजमा करणार असल्याचे पाऊल उचलले आहे. गौणखनिजाचे बेकायदा उत्खनन व वाहतुकीला दंडाची कारवाई म्हणून संबंधित व्यक्तीकडून चालू बाजारभावाच्या पाचपट दंड आकारला जात आहे.तरीही तालुक्यात माती, मुरुम, दगडखाणी, वाळू या गौणखनिजाबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. या ठिकाणी पंचनामा करून संबंधितांवर दंडाची कारवाई करूनही बेकायदा गौणखनिज उत्खनन व वाहतुकीचे प्रमाण कमी न झाल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित तहसीलदार यांच्या आदेशाविरुद्ध काही जण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागत आहेत. अशा वेळी संबंधितांंनी शासकीय दंडात्मक रक्कम विहित कालावधीत शासकीय तिजोरीत भरणे क्रमप्राप्त आहे. मात्र बहुतांश हा गैरप्रकार करणारे  गौणखनिजाबाबत दंड भरत नसल्याने तलाठी व मंडलाधिकारी यांना सात-बारावर बोजा नोंदविण्याकामी आदेश दिले आहेत. ............बेकायदा गौणखनिज उत्खनन व वाहतुकीसंदर्भात कारवाई झालेल्या प्रकरणांत संबंधित व्यक्ती शासकीय रक्कम भरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरीही काही जण या सातबारा उताऱ्यांचे बेकायदा हस्तांतर व्यवहार करून शासनाची फसवणूक करीत आहेत. महसूल जमीन अधिनियम कायद्यात असे हस्तांतरित व्यवहार झाले असतील, तर संबंधितांची मिळकत सरकारजमा करणार असल्याने संबंधितांनी खबरदारी घ्यावी.  - सुनील कोळी, तहसीलदार हवेली

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारcollectorजिल्हाधिकारी