शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

ल्यूसी कुरियन यांचा १०० प्रतिभावान व्यक्तींमध्ये समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 02:14 IST

माहेर संस्थेतील मुलांमध्ये आनंदोत्सव : समाजकार्याची दखल घेतल्याची भावना

शिरूर : ‘वूम वर्ल्ड’ या मासिकाने निवडलेल्या या वर्षाच्या जगातील १०० प्रतिभावान व्यक्तींमध्ये माहेर संस्थेच्या संस्थापिका ल्यूसी कुरियन यांचा समावेश झाल्याने माहेर संस्थेच्या येथील अनाथलयातील मुलांनी आनंदात्सव साजरा केला. वूम वर्ल्ड दरवर्षी जगातील १०० प्रतिभावान व्यक्ती निवडतात. या वर्षी निवडलेल्या व्यक्तींमध्ये सामाजिक कार्यकर्त्या कुरियन यांची निवड म्हणजे त्यांनी आजवर केलेल्या कामाची पावतीच आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे माहेर संस्थेची प्रमुख शाखा असून महाराष्ट्रासह तीन राज्यांत माहेरचे सामाजिक कार्य सुरू आहे. अनाथ, विधवा, परितक्ता, मनोरुग्ण, अविवाहित माता, ज्येष्ठ नागरिक आदी व्यक्तींना ‘माहेर’चा आसरा मिळाला आहे. पदपथांवरील शेकडो व्यक्तींना स्वत: कुरियन यांनी गाडीत घेऊन संस्थेत दाखल केले आहे. अनेक अनाथ मुलींची माय बनून त्यांचे कन्यादान त्यांनी केलेले आहे. अनेक शोषित, पीडित महिलांचे अश्रू पुसताना त्यांना ‘माहेर’ची माया त्यांनी दिली आहे. उपेक्षित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, महिला बचतगट चळवळ यासारख्या त्यांच्या अद्वितीय सामाजिक कार्याची वूम मासिकाने दखल घेतली आहे. यामुळे माहेरच्या अनाथलयातील मुलांनी कुरियन यांचा फोटो जवळ घेऊन आनंदोत्सव साजरा केला.वूम १००च्या जागतिक प्रतिभावान व्यक्तींच्या यादीत चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, मिशेल ओबामा, बौद्ध धर्मगुरू दलाई लामा, ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, जर्मनीच्या चॅन्सलर अँजेलो मॉर्केल, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुटो, टेनिस खेळाडू रॉजर फेडरर आदी महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. जागतिक स्तरावरील या प्रतिभावान व्यक्तींबरोबर ल्यूसी कुरियन यांचाही समावेश झाल्याने माहेर परिवारात आनंदाचे वातावरण आहे. 

टॅग्स :Puneपुणे