शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'फायसर्व्ह'च्या पहिल्या STEM लॅबोरेटरीचे पुण्यात उद्घाटन; ४ हजारांपेक्षा जास्त वंचित विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 17:58 IST

श्री संत तुकाराम विद्यालय, लोहेगाव येथे झाले पहिल्या STEM लॅबोरेटरीचे लोकार्पण

पुणे: आर्थिक सेवा टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स आणि पेमेंट्स मध्ये जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या फायसर्व्ह या कंपनीने पुणे आणि पुण्याच्या आसपास आठ सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षण प्रदान करण्यासाठी आपल्या सायन्स टेक्नॉलॉजी इंजीनीअरिंग आणि मॅथेमेटिक्स (STEM) लॅबोरेटरी प्रोग्रामचे उद्घाटन केले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक खात्याचे या प्रकल्पास समर्थन आहे आणि तो राबवण्याची कामगिरी एक्स्परिफनने फायसर्व्हच्या कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी पार्टनर युनिटेड वे, मुंबई मार्फत केली.

६९ लक्ष रु पेक्षा जास्त गुंतवणुकीसह, प्राथमिक आणि माध्यमिक वर्गांमधील 4000 पेक्षा जास्त वंचित विद्यार्थ्यांना STEM शिक्षणाचे लाभ देण्याचा फायसर्व्हचा इरादा आहे. या उपक्रमाचा फोकस किफायतशीर, अभ्यासक्रमावर आधारित STEM लॅबोरेटरीजची रचना आणि विकास यावर आणि त्याद्वारे संकल्पनेची कल्पना करणे, शोध प्रक्रिया, प्रयोगशीलता आणि शिकण्या-शिकवण्याच्या संपूर्ण नावीन्यपूर्ण पद्धती दाखल करण्यावर आहे. या लॅबोरेटरीच्या मदतीसाठी पहिल्या वर्षासाठी ई-लर्निंग इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (ICT) मोबाइल अॅप्लिकेशन ‘ट्यूटर सपोर्ट’ असेल तसेच क्वालिटी कंट्रोलसाठी प्रोग्राम मॅनेजमेंट वजा इम्पॅक्ट असेसमेंट टूल असेल.

चेन्नई, बंगळूर आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) येथील सरकारी शाळांमध्ये या प्रकल्पाची सुरुवात केल्यानंतर फायसर्व्हने आता पुण्यातील 8 सरकारी शाळांना डिलिव्हरी करून यशस्वीरित्या आपला विस्तार वाढवला आहे. या प्रकल्पामुळे सदर लॅबोरेटरीजच्या जीवनकाळात 4 शहरांतील 34 सरकारी शाळांमधील सुमारे 17000 विद्यार्थ्यांपर्यंत STEM शिक्षण पोहोचले आहे. फायसर्व्हचे अध्यक्ष, ग्लोबल सर्व्हिसेस, श्रीनी क्रिश म्हणाले, “आपण जेथे राहतो आणि काम करतो, तेथे आपल्या समुदायांना सशक्त बनवणे हे सर्वसमावेशक विकासासाठी अटळ आहे. देशभरात STEM शिक्षणाचा प्रचार करण्याच्या आमच्या उपक्रमाद्वारे आम्ही वंचित शाळांमधील तरुण मुलांपर्यंत प्रायोगिक शिक्षण पोहोचवू शकू अशी आम्हाला आशा वाटते. राष्ट्रीय टॅलेंट पूलच्या पायाभरणीसाठी हे आमचे योगदान आहे आणि आम्ही शक्य तितक्या चांगल्या प्रकारे समाजाची परतफेड करत राहू.” फायसर्व्ह गिव्ह्ज बॅक हा या कंपनीचा ग्लोबल कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी प्रोग्राम आहे, ज्याचा उद्देश आपण ज्या समुदायात राहतो आणि काम करतो, त्या समुदायांसाठी चार महत्त्वाच्या क्षेत्रांत एक सकारात्मक अनुभव तयार करणे हा आहे. ही चार मुख्य फोकस क्षेत्रे आहेत – शिक्षणाचा प्रचार, पर्यावरणीय व्यवस्थापन, समावेशकता आणि आरोग्य व कल्याण.

या उपक्रमात समाविष्ट असलेल्या शाळा पुढील प्रमाणे आहेत:-

  1. श्री संत तुकाराम विद्यालय, लोहेगाव, पुणे
  2. शिवराज विद्या मंदिर वडगांव शेरी, पुणे
  3. श्री संत तुकाराम माध्यमिक विद्यालय, चंदन नगर, पुणे
  4. कृष्णाजी खंडूजी घुले विद्यालय, पुणे
  5. बालसिद्धनाथ विद्यालय, बेलसर, पुरंदर, पुणे
  6. यशवंत विद्यालय मावडी के. पी. भागशाळा, पांडेश्वर, पुरंदर, पुणे
  7. मावडी पिंपरी हायस्कूल, पिंपरी, पुरंदर, पुणे
  8. शंकरराव कोलते विद्यालय, पिसर्वे, पुरंदर, पुणे
टॅग्स :Puneपुणे