शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पुणे गणेशोत्सव! ज्या पोलिसांनी परवानगी नाकारली त्यांच्याच हस्ते 'अफजलखान खान' देखाव्याचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 15:59 IST

कोथरूड येथील संगम तरुण मंडळ मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना व प्रसंगावर आधारित देखावा सादर केला केला जातो

पुणे: कोथरूड भागातील संगम तरुण मंडळाला अफजल खानचा वध या विषयावरील जिवंत देखावा दाखविण्यास कोथरुड पोलिसांनी परवानगी नाकारली होती. शहरात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून परवानगी नाकारल्याचे कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पत्रातून कळवले होते. तेच पोलीस निरीक्षक जगताप यांच्या हस्ते बहुचर्चित अफजलखानाचा वध देखाव्याचा पहिल्या प्रयोगाचा शुभारंभ आज सायंकाळी होणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी या अविस्मरणीय सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.  

कोथरूड येथील संगम तरुण मंडळ ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवामध्येछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना व प्रसंगावर आधारित देखावा सादर होतो. या वेळी मंडळाने गणेशोत्सवासाठी अफजलखानाचा वध या विषयावरील जिवंत देखावा सादर करण्यात येणार असून त्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र कोथरूड पोलिसांना पाठविले होते. दरम्यान, कोथरूड पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत चर्चेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणून हा देखावा सादर करण्यास परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र संबंधित मंडळाला पाठविले होते.  दरम्यान आम्ही भूमिकेवर ठाम आहोत. आम्ही देखावा करणार. आपण रोज घेतो तो श्वास आणि खातो तो घास हे फकत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे. मग या शिवाजी महाराज यांचा इतिहास जर आम्ही हिंदुस्थानात दाखवायचं नाहीतर तो दाखवायला काय आम्ही पाकिस्तानात जायचं का? इतिहास नाकारता येणार आहे का...? पोलीस म्हणतात वरून आदेश आहे, हे वरून आदेश नेमके कोणाचे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला होता. तसेच मंडळाने आंदोलनाचं इशाराही दिला होता. त्यावेळी पोलिसांनी तातडीने देखावा सादर करण्यास परवानगी दिली.  

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज