शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारने ७ वाहनांना उडवले, एक महिला ठार तर ५ जखमी; चौफुला येथे भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 23:45 IST

भरधाव आय-20 गाडीने दोन रिक्षा, चार दुचाकी आणि पिकअप वाहनाला उडवले  चौफुला परिसरात खळबळ

वरवंड / केडगाव  - दौंड तालुक्यातील चौफुला येथे पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौफुला- वरवंड रोडवर परिसरात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास  झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. भरधाव वेगाने धावणाऱ्या आय २० कारने दोन  रिक्षा, तीन दुचाकी आणि एक पिकअप वाहनाला जबर धडक दिली. या अपघातात एका महिलेला जागीच ठर झाली  असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

 आय २० कार पुण्याकडून सोलापूरकडे प्रचंड वेगात जात असताना  चौफुला चौकाजवळ वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन प्रवासी रिक्षांना जोरदार धडक दिली. त्यानंतर ती कार चार दुचाकींवर आदळली आणि शेवटी पिकअप वाहनावर आदळली. त्यानंतर बस स्टॉप वर उभे असणारे पाच जणांना उडवले त्यातील एक महिला जागीच ठार झाली. इतर जखमी प्रवाशांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी गजेंद्र भारत अन्नदाते, वय ६२ वर्षे, व्यवसाय मजुरी, सध्या रा. कोरेगाव, कृष्ण कुंज निवास, ता. शिरूर, जि. पुणे, मुळ गाव. वाशी, ता. बार्शी, जि. सोलापुर,  या अपघाता मध्ये  पदमावती भारत अन्नदाते, वय ८४ वर्षे,या अपघातात ठार झाल्या आहेत. बस स्टॉपला बसची वाट पाहत असताना एका आय २० कार चालक याने त्याचे ताब्यातील वाहन वेगाने बेदारकरपणे, वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगात चालवत होता. त्याने चारचाकी वाहनाने बस स्टॉप येथे थांबलेल्या लोकांना तसेच तेथे उभ्या असलेल्या मोटार सायकल, रिक्षा, व पिक गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. 

या अपघातात इतर ५ जणांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  १) प्रसाद मांरेश्वर कुलकर्णी, ग. सावंत गल्ली, करमाळा, ता. करमाळा, जि. मोलापुर, २) सलिम रसूलभाई शेख, रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे, ३) बालाजी कोंडीबा पावडे, रा. बोरीपारधी, चौफुला, ता. दौंड, जि. पुणे, ४) प्रतिक व्यंकटेश शिर्के, रा. बोरीपारधी, ता. दौंड, जि. पुणे, ५) व्यंकटेश देवराज शिर्के, रा. बोरीपारधी, ता. दौड या जखमींवर उपचार सुरू आहे. या धडकेचा आवाज ऐकून नागरिक घटनास्थळी धावले. अपघात इतका भीषण होता की काही वाहनांचे अक्षरशः तुकडे झाले. ठार झालेली महिला रस्त्याच्या कडेला उभी असताना कारने तिला चिरडले, अशी  माहिती मिळाली आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Speeding Car Hits 7 Vehicles: One Dead, Five Injured

Web Summary : A speeding car in Chawfula, Daund, collided with multiple vehicles, killing a woman and injuring five others. The I20 car, en route from Pune to Solapur, lost control, hitting two rickshaws, three bikes, and a pickup truck near Chawfula Chowk. Injured individuals are receiving treatment at a nearby hospital.
टॅग्स :Accidentअपघात