शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड शहरात ऑक्टोबर हिटने घामाच्या धारा, बदलत्या हवामानाने रुग्णांमध्येही वाढ

By प्रकाश गायकर | Updated: October 9, 2023 13:00 IST

परिणामी नागरिक उकाड्याने हैराण झाले असून आरोग्यावरही त्याचा परिणाम झाला आहे....

पिंपरी : महाराष्ट्रातून मॉन्सून परतीच्या वाटेवर असून पिंपरी चिंचवड शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून ‘ऑक्टोबर हिट’चा चटका जाणवत आहे. दिवसा व रात्रीही हवेत उष्णता जाणवत आहे. तर दिवसभर नागरिक घामाच्या धारांमध्ये न्हाऊन निघत आहे. परिणामी नागरिक उकाड्याने हैराण झाले असून आरोग्यावरही त्याचा परिणाम झाला आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून दुपारच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. तर, हवामान कोरडे राहणार असून, उकाडा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून दुपारचे तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचा चांगलाच चटका बसत असून ‘ऑक्टोबर हिट’ जाणवत असल्याने दुपारी बाहेर फिरताना घाम फुटत आहे. शहरात रविवारी (दि. ९) दुपारचे तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. दुपारी कडक ऊन, रात्रीही हवेमध्ये उष्णता जाणवत आहे. मात्र, पहाटे अंगाला झोंबणारी थंडी जाणवत आहे. त्यामुळे दिवसभर घामाच्या धारा वाहत असल्या तरी पहाटे थंडी वाजत आहे. या वातावरण बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. शहरात थंडी-ताप व व्हायरल आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.काळजी घेण्याचे आवाहनअचानक हवामानामध्ये बदल झाला आहे. ऑक्टोबर हिट जाणवू लागली आहे. त्यामुळे बदलेल्या वातावरणामध्ये नागरिकांनी काळजी घ्यावी. शरिराचे तापमान नियंत्रित राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, फळांचे सेवन करावे. तसेच योग्य आहार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड