शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

१२१ भारतीय भाषांमध्ये, १२१ गाण्यांचे सलग साडे तेरा तास सादरीकरण; मंजुश्री ओक यांचा अनोखा विक्रम

By श्रीकिशन काळे | Updated: June 1, 2023 13:09 IST

देशातील ही विविधता भाषा आणि गाण्यांच्या स्वरूपात जगापर्यंत पोहोचावी या उद्देशाने केलेला प्रयत्न यशस्वी ठरला

पुणे: विविधतेत एकता या सूत्राने आपला देश बांधला गेला आहे. याच एकात्मकतेचे दर्शन पुण्याच्या सुप्रसिद्ध गायिका मंजुश्री ओक यांनी ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ आपल्या नावावर करत घडवून आणले आहे. भारतातील तब्बल १२१ भाषा, बोलीभाषा आणि उपभाषा यांमध्ये सलग साडे तेरा तास १२१ गाण्यांचे सादरीकरण करीत ओक यांनी जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. गुरुवार दि. १० ऑक्टोबर, २०१९ रोजी सदर विक्रमासाठी त्यांनी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे झालेल्या ‘अमृतवाणी – अनेकता मैं एकता’ या कार्यक्रमात प्रयत्न केला होता. नुकतेच गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् यांकडून हा विक्रम पूर्ण झाल्याचे त्यांना नुकतेच कळविण्यात आले आहे. या आधी ओक यांनी २०१७ व २०१८ अशी सलग दोन वर्षे ‘इंडिया बुक ऑफ रेकोर्डस्’ व ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये देखील प्रत्येकी दोन विक्रम नोंदविले आहेत.

याबद्दल माहिती देताना मंजुश्री ओक म्हणाल्या, “लहानपणापासून अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असताना आपल्या संगीत क्षेत्रातील प्रयत्नांद्वारे देशासाठी काहीतरी योगदान द्यावे, हा विचार मनात होता. याच दृष्टीने प्रयत्न करीत असताना श्री यशलक्ष्मी आर्ट तर्फे आणि पद्मनाभ ठकार यांच्या विशेष सहकार्याने पुण्यात ‘अमृतवाणी – अनेकता मैं एकता’ हा कार्यक्रम केला. वीस मैलांवर जशी भाषा बदलते तशीच भारताचा विचार केल्यास भाषेमधील वैविध्य प्रकर्षाने समोर आले. आज भारतात १८०० हून अधिक भाषा, बोलीभाषा, उपभाषा बोलल्या जातात. विशेष म्हणजे या सर्व भाषांवर त्या त्या भागांतील संस्कृती, संगीत, परंपरा, भौगोलिक, सामाजिक परिस्थिती यांचा ठळकपणे प्रभाव दिसून येतो. देशातील ही विविधता भाषा आणि गाण्यांच्या स्वरूपात जगापर्यंत पोहोचावी या उद्देशाने मी हा विक्रम करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरला.”

२०१९ हे वर्षे युनोच्या वतीने ‘स्वदेशी भाषा वर्ष’ म्हणून जाहीर झाले असताना या प्रयत्नाने अनेकांपर्यंत पोहोचता आले आणि भारतीय भाषांची समृद्धी जगासमोर मांडता आली याचा अभिमान आहे. भाषा निवडताना जनगणना कार्यालयाच्या अहवालांचा विशेष उपयोग झाला. शिवाय प्रत्येक भाषेप्रमाणे गीताच्या चाली, बोल, लहेजा यांवर देखील काम करता आले. यामधील काही गाणी ही कवितेच्या स्वरूपात होती त्याला संगीत देत, उच्चार लक्षात घेत, भाव लक्षात घेत त्याचे सादरीकरण हे मोठे आव्हान होते. या १२१ भाषांमध्ये उत्तर व दक्षिण भारतातील सर्व प्रमुख भाषांबरोबरच ईशान्य भारतातील बोलीभाषा, निकोबारी भाषा, हिंदीची उपभाषा असलेली भोजपुरी या भाषांचा देखील समावेश आहे. तर गाण्यांमध्ये पारंपारिक गीते, लोकगीते, भक्तीगीते, भावगीते, अभंग, देशभक्तीपर गीते, लावणी अशा विविध गाण्यांच्या प्रकारांचा समावेश केल्याचे ओक यांनी आवर्जून सांगितले.

मंजुश्री ओक यांनी एसएनडीटी महाविद्यालय येथून संगीत विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली असून त्यांना राष्ट्रीय पातळीवरील शिष्यवृत्ती प्राप्त आहे. आपले वडील वसंत ओक यांकडे त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरविले नंतर पद्मश्री पं ह्दयनाथ मंगेशकर यांकडे त्या गाणे शिकल्या आहेत. आकाशवाणीच्या ग्रेडेड कलाकार असलेल्या ओक यांनी आजवर संगीताचे अनेक कार्यक्रम तर केले आहेतच शिवाय गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् सोबत २०१७ व २०१८ अशी सलग दोन वर्षे ‘इंडिया बुक ऑफ रेकोर्डस्’ व ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ असे प्रत्यकी २ रेकॉर्डस् स्वत:च्या नावावर करीत त्यांनी विक्रम नोंदविले आहेत. अशा पद्धतीने रेकॉर्डस् करणाऱ्या त्या एकमेव आशियाई गायिका आहेत. शिवाय स्वदेशी भाषांमध्ये असे  रेकॉर्ड केलेल्या जगातील एकमेव व्यक्ती आहेत.

टॅग्स :Puneपुणेartकलाcultureसांस्कृतिकmusicसंगीतIndiaभारत