शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मान्यतेच्या चिरीमिरीला आळा, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 05:14 IST

शिक्षकांच्या मान्यतेचे प्रस्ताव मुद्दाम रखडवून एजंटांच्या माध्यमातून तसेच थेटपणे चिरीमिरी घेण्याच्या प्रकाराला आता आळा बसणार आहे.

पुणे : शिक्षकांच्या मान्यतेचे प्रस्ताव मुद्दाम रखडवून एजंटांच्या माध्यमातून तसेच थेटपणे चिरीमिरी घेण्याच्या प्रकाराला आता आळा बसणार आहे. शाळांकडून शिक्षणाधिकारी तसेच विभागीय उपसंचालक कार्यालयांकडे दाखल झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यतेचा प्रस्ताव दोन महिन्यांच्या (आठ आठवडे) आत निकाली काढण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.राज्यातील हजारो शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालकांकडे रखडले आहेत. याप्रकरणी एका शिक्षणसंस्थेने औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. तीवर निर्णय देताना शिक्षक मान्यतेच्या प्रकरणांचा निपटारा दोन महिन्यांच्या आत करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाकडून त्याबाबची अंमलबजाणी करण्याचे परिपत्रकही काढण्यात आले आहे. शिक्षण संचालक, विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.शिक्षक मान्यतेच्या प्रस्तावांवर वर्षानुवर्षे निर्णय न घेता तीप्रकरणे स्थगित ठेवण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर, शिक्षक मान्यतेच्या प्रस्तावांना मंजुरीसाठी पैसे घेण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे मान्यतेचा निर्णय घेण्यासाठी एक निश्चित कार्यकाळ ठरवून देण्यात आला आहे.सद्य:स्थितीतील प्रस्तावांनाही नियम1शाळेतील शिक्षकांच्या नियुक्तीसाठी आलेले प्रस्ताव नियमानुसार आहेत का, त्याची खात्री करावी. संस्थेकडून आलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षणसेवक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यासाठी प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत त्यावर निर्णय घ्यावा. तो निर्णय संबंधित संस्था अथवा विद्यालयप्रमुखांना कळवावा. सद्य:स्थितीत प्रलंबित असलेल्या प्रस्तावावरदेखील दोन महिन्यांच्या आता निर्णय घ्यावा, असे आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.2 शिक्षक मान्यतेचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी करून आठ आठवड्याच्या आत संबंधित संस्था, विद्यालयांना निर्णय न कळविल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल. तसेच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक