शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

गल्लीबोळातील गुंडांकडे दहशतीसाठी बेकायदा पिस्तूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:39 IST

पुणे : एकाच दिवसात तीन ठिकाणी गोळीबार झाल्याने गेल्या आठवड्यात पुणे शहर हादरले होते; पण हा आता अपवाद राहिलेला ...

पुणे : एकाच दिवसात तीन ठिकाणी गोळीबार झाल्याने गेल्या आठवड्यात पुणे शहर हादरले होते; पण हा आता अपवाद राहिलेला नाही़ गल्लीबोळांत छोट्या-मोठ्या गुंडांकडे बेकायदा पिस्तूल सर्रासपणे वापर होऊ लागला आहे़ मध्य प्रदेशातून येणाऱ्या बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा शहरात निर्विघ्नपणे सुरूअसून, त्यातील काहीच पोलिसांच्या हाती लागतात़.

नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत पिस्तुलाचा वापर करून गुन्हा केल्याच्या किमान सहा घटना घडल्या आहेत़ त्यातील तीन घटनांमध्ये दहशत माजविण्यासाठी पिस्तुलाचा वापर केला गेल्याचे उघड झाले आहे़ गेल्या तीन वर्षांत पुणे शहरात बेकायदा पिस्तूल बाळगल्याचे २९८ गुन्हे दाखल झाले असून, त्यात ३८९ आरोपींकडून ३९५ पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत़

सुरुवातीला पुण्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमधून शस्त्रे येत होती़ बिहारमधून येणाºया रेल्वेतून अगदी सामान्य वाटणाºया मजुरांचा त्यासाठी वापर केला जात होता़ ते आपल्या मुलाबाळांसह कपडेलत्ते घेऊन येत असत़ त्यांच्या सामानात लपवून ही हत्यारे आणली जात असे़ त्यासाठी त्यांना मामुली रक्कम दिली जात़ अगदी तुपाच्या डब्यातून शस्त्रे आणली जात असल्याचे यापूर्वी आढळून आले़ पोलिसांच्या हाती केवळ शस्त्राची वाहतूक करणारेच लागतात़ उत्तर प्रदेश, बिहार येथे जाऊन कारवाई करून म्होरक्यांना ताब्यात घेणे शक्य नसल्याने ही कारवाई केवळ शस्त्र बाळगणाºयांपर्यंतच सीमित राहते़ उत्तर प्रदेश, बिहारमधून शस्त्रे आणणाºयांची मोठ्या प्रमाणावर धरपकड झाल्यानंतर मध्य प्रदेशातून पुण्यात शस्त्रे येण्याचे प्रमाण वाढले आहे़ सध्या महाराष्ट्राच्या सीमाभागाला लागून असलेल्या मध्य प्रदेशातून ही शस्त्रे प्रामुख्याने आणली जात आहेत़

शस्त्र बाळगणे ही होतेय फॅशनउपनगरांमध्ये जागेच्या किमती वाढल्यामुळे त्या विकून, तसेच त्याच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारातून अनेकांना कोट्यवधीचा पैसा मिळू लागला़ त्यामुळे त्यांचे हितशत्रूही तयार झाले; पण कायदेशीरदृष्ट्या त्यांना शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळणे शक्य नसल्याने अशांचा या बेकायदेशीर शस्त्रांकडे ओढा वाढला़ बिहार, मध्य प्रदेशात काही हजारांत मिळणारी ही शस्त्रे पुण्यात ग्राहक पाहून अगदी २० हजार रुपयांपासून ७० ते एक लाख रुपयांपर्यंत मिळतात़

शस्त्रे बाळगणाºयांमध्ये गुंडांबरोबर राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाºयांचाही हात आहे़ आपल्या भागात दहशत निर्माण करण्यासाठी आणि भाई, दादा म्हणून मिरविण्यासाठी एखादे शस्त्र असेल, तर ते काम अधिक सोपे होते़निवडणुकांमध्ये अनेक उमेदवार अशा भार्इंचा आधार घेऊन झोपडपट्टी भागात आपल्याकडे मतदारांना वळवून घेण्यासाठी उपयोग करीत आहेत.