शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या 'या' कृतीने बारामतीत अवैध सावकारांचे धाबे दणाणले! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 13:11 IST

शहरातील एका बड्या व्यापाऱ्याने सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे

ठळक मुद्देपठाणी वसुली थांबविण्यासाठी तक्रार करण्याचे आवाहन 

बारामती : बारामती शहरातील एका बड्या व्यापाऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यांच्या कुटुंबियांनी देखील याबाबत संशय व्यक्त केला आहे. जुलमी पध्दतीने वसुली करत निर्ढावलेल्या अवैध गब्बर सावकारांविरुध्द पोलिसांनी प्रथमच आक्रमक पवित्रा उचलला आहे. त्यामुळे या सावकारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. 

शहर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांची बदली झाली आहे.त्याच्या जागेवर पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. याच दरम्यान,शहरातील एका बड्या व्यापाऱ्याने सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.  त्यांच्या कुटुंबियांनी देखील याबाबत संशय व्यक्त केला आहे. पोलीस निरीक्षक शिंदे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सावकारांच्या दबावातुन बड्या व्यापाऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते,तिथे सर्व सामान्यांचे काय ,असा प्रश्न पोलीस प्रशासनाला पडला आहे.या पार्श्वभूमीवर अस्वस्थ झालेल्या पोलिसांनी सावकाराच्या अन्यायाला बळी पडलेल्या नागरिकांचा शोध सुरु केला आहे.त्यासाठी पोलिसांनी रिक्षा लावुन सावकारांविरोधात चक्क दवंडी देण्यास सुरवात केली आहे. सावकारी करण्याचा परवाना नसलेल्या ,अवैध रितीने पैसे देणाऱ्यांनी त्यांचा धंदा थांबवावा.त्यांची एक रुपया देखील वसूली होऊ शकणार नाही.त्यांनी त्यांची वसुली थांबवावी.अन्यथा गाठ खाकी वर्दीशी आहे,असा सज्जड दम पोलीस निरीक्षक शिंदे यांनी भरला आहे.अवैध सावकारांचा त्रास होत असेल तर थेट पोलिसांना माहिती द्यावी.स्वत: पोलिस अधीक्षकांनीही याची नोंद घेतली असल्याने बारामतीत सावकारी हद्दपार होण्याची चिन्हे आहेत. 

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस