युवराज दतात्रेय पाटणे (वय ४२, रा. चाकण), हनुमंत देवराम काची (वय ३४, रा. मरकळ, खेड), अक्षय मिलिंद गायकवाड (वय २४, रा. भोसे, खेड) , मल्लिनाथ दतात्रेय कोळी (वय २८, रा. चाकण, खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार: आरोपी देशी-विदेशी दारूची अवैध पद्धतीने वाहतूक करत असताना आढळून आले. त्यांना मेदनकरवाडी जवळून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ५ लाख ४० हजारांची पिकअप जीप, ७ लाख ८० हजारांची एक मोटारकार आणि आठ लाखांची देशी-विदेशी दारू असा एकूण २६ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अवैध दारू वाहतूक; २६ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST