शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटीएमचे शास्त्रज्ञ होणार शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 21:28 IST

वातावरण व अवकाश शास्त्र तसेच पर्यावरण शास्त्र क्षेत्रांमध्ये विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना ‘आयआयटीएम’मधील शास्त्रज्ञांकडून धडे मिळणार आहेत. 

ठळक मुद्देविद्यापीठातील विद्यार्थ्यांना देणार धडेज्ञान व संशोधनाची व्याप्ती वाढविण्याबरोबरच प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणेही शक्य होणार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम ) यांच्यात शुक्रवारी शैक्षणिक करार झाला. या करारामुळे वातावरण व अवकाश शास्त्र तसेच पर्यावरण शास्त्र क्षेत्रांमध्ये विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘आयआयटीएम’मधील शास्त्रज्ञांकडून धडे मिळणार आहेत. कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. प्रफुल्ल पवार आणि आयआयटीएमचे संचालक प्रा. रवी. एस. नंजुंदियाह यांनी स्वाक्षरी केली. यावेळी भौतिकशास्त्र व पर्यावरण शास्त्र या विभागांचे विभागप्रमुख डॉ. सुरेश गोसावी, वातावरण व अवकाश शास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रदीप कुमार, सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड रिसर्च (आयआयटीएम) संचालक डॉ. आर कृष्णन आणि आयआयटीएमचे शैक्षणिक समन्वयक डॉ. पी. मुखोपाध्याय उपस्थित होते.  वातावरण शास्त्र क्षेत्रातील एम.एस.सी. आणि एम.टेक. या दोन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आयआयटीएमचे शास्त्रज्ञ शिकविणार आहेत. याचबरोबर, आयआयएमटीमधील तज्ज्ञांना विद्यापीठातील पर्यावरण विज्ञान विभागामध्ये एम. फिल वा पीएच.डी. करण्यास या करारान्वये पात्र ठरतील.करारानुसार विद्यापीठ व आयआयटीएम वातावरण शास्त्र व संबंधित क्षेत्रांमधील संशोधन व विकास आणि प्रशिक्षणाची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी परस्पर सहकार्य करतील. दोन्ही संस्था परस्पर सहकार्याने शैक्षणिक अभ्यासक्रम (टीचिंग प्रोग्राम) राबवितील. वातावरण व अवकाश शास्त्र, पर्यावरण शास्त्र आणि इतर संबंधित विभागांमधील अध्यापकांमधील ज्ञानाची देवाणघेवाण वाढविली जाईल. या अभ्यासक्रमामध्ये शिकविणाऱ्या  आयआयटीएमच्या शास्त्रज्ञांस त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार सहाय्यक प्राध्यापक वा त्यावरील पदांचा दर्जा दिला जाईल. या करारामुळे  वातावरण व अवकाश शास्त्र क्षेत्रामधील ज्ञान व संशोधनाची व्याप्ती वाढविण्याबरोबरच प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणेही शक्य होणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठ