शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीसाठी नियमांकडे डोळेझाक, झाडांच्या फांंद्या कापल्या, पाहणी न करताच परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 06:01 IST

स्मार्ट सिटी कंपनीसाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने नियमांकडे डोळेझाक केली असल्याचे दिसते आहे. कंपनीने बसवलेल्या डिजिटल बोर्डवर येणाºया वृक्षांच्या फांद्या तोडण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी न करताच परवानगी दिली असल्याचा आरोप होत आहे.

पुणे : स्मार्ट सिटी कंपनीसाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने नियमांकडे डोळेझाक केली असल्याचे दिसते आहे. कंपनीने बसवलेल्या डिजिटल बोर्डवर येणाºया वृक्षांच्या फांद्या तोडण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी न करताच परवानगी दिली असल्याचा आरोप होत आहे.महापालिकेची परवानगी न घेताच हे डिजिटल बोर्ड शहरात अनेक ठिकाणी सुरू केले असल्याचे प्रकरण सध्या गाजते आहे. आकाशचिन्ह विभागाने यासंदर्भात स्मार्ट सिटी कंपनीला नोटीसही बजावली आहे. आता हेच बोर्ड बसवताना कंपनीने त्याआड येणाºया वृक्षांच्या फांद्याही बिनदिक्कतपणे तोडल्या असल्याचे समोर आले आहे. काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे पदाधिकारी हृषीकेश बालगुडे यांनी विचारलेल्या माहितीमधून ही गोष्ट उघड झाली आहे.रस्त्याच्या कडेला सिमेंटचा चौकोनी चौथरा उभा करून त्यावर हे उंच डिजिटल बोर्ड बसवण्यात आले आहेत. त्यावरून नागरिकांसाठी प्रबोधनपर तसेच माहितीपर मजकूर आकर्षक रंगीत डिजिटल स्वरूपात प्रसारित करण्यात येत असतो. आपत्ती काळात देण्यात येणाºया सूचनांसाठीही याचा चांगला वापर होणार असल्याचे स्मार्ट सिटी कंपनीचे म्हणणे आहे. सध्या तरी त्यावर जाहिराती प्रसारित करण्यात येत नाहीत; मात्र केल्या तर त्याचे उत्पन्न कोण घेणार हाही प्रश्न आहे. बोर्ड स्मार्ट सिटी कंपनीचे व जागा महापालिकेची अशी असली तरीही याबाबत कसलाही करार वगैरे काहीही झालेले नाही.दरम्यान, हे बोर्ड बसवले आहेत त्या बहुतेक ठिकाणी चांगली वृक्षराजी आहे. या वृक्षांच्या मोठ्या फांद्या काही ठिकाणी थेट बोर्डवर येत असल्याचे कंपनीच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्या फांद्या काढून टाकल्या. एखादा वृक्ष किंवा त्याच्या धोकादायक फांद्या काढून टाकायच्या असतील तर त्यासाठी कायद्याचे बंधन असलेली पद्धत आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे संबंधितांनी अर्ज करायचा, समिती त्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करून फांदी तोडायची गरज आहे किंवा नाही हे ठरवणार, तसा अहवाल तयार करणार व त्यानंतरच परवानगी द्यायची, अशी ही पद्धत आहे.स्मार्ट सिटी कंपनीसाठी ही पद्धत डावलली गेली असल्याचे बालगुडे यांनी घेतलेल्या माहितीवरून दिसते आहे. स्मार्ट सिटी कंपनीने परवानगी मागितली होती; मात्र कसलीही पाहणी न करताच ती दिली गेली. एरवी या समितीकडे अर्ज केल्यानंतर कित्येक महिने त्यावर चर्चाच होत नाही, निर्णय घेतला जात नाही, असा सर्वसामान्य नागरिकांचा अनुभव आहे. अशी अनेक प्रकरणे आजही समितीकडे पडून आहेत. समितीचे अध्यक्ष असलेले आयुक्त उपलब्ध नाहीत, सदस्य सचिव नाहीत, अशा कारणांवरून बैठक पुढे ढकलली जात असल्याचे समिती सदस्यांचेही म्हणणे आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या परवानगीचा तर विषय समितीपुढे आलेला नाही, असे काही सदस्यांनी स्पष्ट केले.परवानगी न घेताच बोर्ड लावल्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. अन्य कंपन्यांकडून महापालिका अशा बोर्डसाठी वार्षिक शुल्क आकारत असते. आता डिजिटल बोर्डच्या आड येणाºया झाडांच्या फांद्या तोडून स्मार्ट सिटी कंपनीला शहरात मुक्त वावर करू दिला जात आहे, अशी टीका बालगुडे यांनी केली आहे.कंपनीने समितीकडे परवानगी मागितली होती. त्यानंतर पाहणी वगैरे झाली किंवा कसे हे माहिती घेऊन सांगावे लागेल. फांद्या तोडायच्या असतील तरीही समितीची परवानगी लागते हे बरोबर आहे. त्याशिवाय फांदी तोडली गेली असेल तर समिती त्यावर कारवाईही करू शकते. या प्रकरणात कागदपत्रे पाहावी लागतील.- दयानंद घाडगे, सदस्य सचिव,वृक्ष प्राधिकरण समिती, महापालिका

टॅग्स :Puneपुणे