शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

शरद पवारांनी योग्य वेळी काळजी घेतली असती तरी देखील चित्र वेगळे असते; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

By राजू हिंगे | Updated: January 7, 2024 18:04 IST

लोकसभा आणि विधानसभेत प्रंचड मोठा विजय महायुतीला मिळणार

पुणे:  देवेंद्र फडणवीस आता टीव्हीवर दिसत नाहीत. अजितदादा दिसतात, मुख्यमंत्री तर रोजच दिसतात. पण आधीसारखे देवेंद्र फडणवीस दिसत नाहीत, अशा चिमटा सुप्रिया सुळे घेतला होता. त्याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, माझी जेवढी काळजी खासदार सुप्रिया सुळे करतात. त्यांच्या दहा टक्के काळजी योग्य वेळी केद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली असती तरी देखील चित्र वेगळे राहिले असते असा शब्दांत त्यांनी टोला लगावला. पुणे शहर भाजपच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळिक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ , महिला आघाडीच्या प्रमुख हर्षदा फरांदे आदी उपस्थित होते. त्यावेळी ते पत्रकाराशी बोलत होते. 

पुणे भाजपने शहर कार्यालय चांगले तयार केले आहे. चांगले कार्यालय झाले तसे भाजपचे पुण्यातही काम चांगले आहे. लोकसभा आणि विधानसभेत प्रंचड मोठा विजय महायुतीला मिळले असे सांगुन देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्याचा गृहमंत्री होता. तेव्हा राज्यात आलबेल होते. आंबानीच्या घरासमोर बॉम्ब ठेवला जात नव्हता. त्यावेळी गृहमंत्र्यावर शंभर कोटीचे आरेाप होत नव्हते. साक्षीदाराची हत्या होत नव्हती. अतिशय चांगले काम केले जात होते. त्यामुळे आता यावर काय उत्तर दयायचे अशा उपरोधिक शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या राज्यात गुन्हेगारी वाढलेल्या टिकेला उत्तर दिले आहे. 

भाजपचे आमदार सुनिल कांबळे यांनी पोलिस शिपायाला कानाखाली मारली याबाबत त्याबाबत गृहखात्याचे प्रमुख म्हणून ठोस कारवाई करणार का या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुप्रिया ताई सांगतात म्हणून थोडे काही होत असते. जी कारवाई करायची असते ती पोलिसांनी केली आहे. येत्या २२ जानेवारी रोजी काळाराम मंदिरात पुजा करणार असल्याचे शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे याबाबत विचारले असता ते म्हणाले, कुठल्या तरी मंदिरात चालले आहे. हे नसे थोडे आहे. उध्दवजी मंदिरात जाण्यास तयार झाले आहे असा टोला फडणवीस यांनी लगावला. राममंदिराच्या निमित्ताने अक्षता वाटप आणि अन्य कार्यक्रम सुरू आहे. त्या निमित्ताने भाजपचा घरी जाण्याचा प्रयत्न आहे त्याबाबत फडणवीस म्हणाले, हा भाजपचा कार्यक्रम नाही. हा राम भक्ताचा आणि कार सेवकांचा कार्यक्रम आहे. ज्यांची ज्यांची रामावर श्रध्दा आहे तो चालला आहे. तो अक्षता देत आहे. त्यांच्या बददल कोणालाही दुख होण्याचे कारण नाही. भुमिका पक्की, तुसभरही दुर झालो नाही 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचा मेळावा झाला. त्यावेळी बॅनरवर नवाब मलिक यांचा फोटो लावण्यात आला  होता. याबददल विचारले असता देवेद्र फडणवीस म्हणाले,  माझी भुमिका पक्की आहे. जी माझी भुमिका आहे. तीच भाजपची भुमिका आहे. त्यापासुन आम्ही तुसभरही दुर झालाे नाही.

पुरवा दिला तर परिक्षा रदद केली जाईल 

तलाठी परिक्षेतील घोटाळा बाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले,  कॉग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी कुठल्याही पुरवा दिला तर निश्चितपणे चौकशी करण्यात येईल.नुसत्या विधानाने चौकशी करता येत नाही. महाराष्ट्रात एवढया मोठया प्रमाणात परिक्षा पारदर्शकपणे घेत आहे. कुठल्या परिक्षेबाबात कुणीही पुरवा  दिला तर ती रदद केली जाईल. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे त्यांनी पुरावा द्यावा. 

बैठकीत संघटनात्मक आढावा घेतला 

आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची बैठक  झाली.त्याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले, नियोजनाची ही बैठक होती.  साधारणपणे अधुन मधुन अशा बैठका घेतो. निवडणुकीपुर्वी अशा बैठका घेतो. ज्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने प्रमुख पदाधिकारी यांची मते ऐकुन घेतली जातात. तयारी करताना काय केले पाहिजे. कोणत्या विषयांना महत्त्व दिले पाहिजे. विशेष संघटनात्म चर्चा असते. राष्ट्रीय संघटन मंत्री आले होते. त्यांनी संघटनेचा आढावा घेतला असे देवेद्र फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणSocialसामाजिकSharad Pawarशरद पवार