शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

...तर पुण्याचे मॉडेल राज्याला वापरावे लागेल : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 03:20 IST

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या संकल्पनेतून स्वतंत्र पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यात दोन शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी सुरू आहे. ती यशस्वी झाल्यास विद्यार्थ्यांचे दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारला या प्रयोगाच्या अंमलबजावणीबाबत विनंती करण्यात येईल.

बारामती - विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या संकल्पनेतून स्वतंत्र पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यात दोन शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी सुरू आहे. ती यशस्वी झाल्यास विद्यार्थ्यांचे दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारला या प्रयोगाच्या अंमलबजावणीबाबत विनंती करण्यात येईल. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे मॉडेल म्हणून राज्याला करावे लागेल, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.शारदानगर येथे पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा शिक्षण परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०१७-१८ चे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पवार बोलत होते. पवार यांच्या भाषणाच्या सुरुवातीला सासवड येथील आनंद काटे या विद्यार्थ्याने पवार यांना थेट व्यासपीठावर जाऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत पत्र दिले. या पत्राचा संदर्भ घेऊनच पवार यांनी भाषणाला सुरुवात केली.पवार म्हणाले, की देशात योगदान देणारे चांगले खेळाडू, कलाकार अशा स्पर्धांमधून पुढे येतील, याची खात्री आहे. जीवनातील संघर्षाला सामोरे जाण्याचे बळ खेळातूनच मिळते. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवजागृती निर्माण होणे आवश्यक आहे. शिक्षकांनी चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडवावेत. मात्र, विद्यार्थी घडविताना आपण चारित्र्यसंपन्न आहोत का, याचे आत्मपरीक्षणदेखील करावे.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते म्हणाले, की शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या खेळाला वाव मिळावा. त्यातून अर्जुन पुरस्कार विद्यार्थी घडावेत, अशी आजच्या कार्यक्रम आयोजनामागे भूमिका आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर लॅब सुरू करण्यात येतील. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात येईल.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे म्हणाले, पुढील काळातील आव्हाने पेलण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थी तयार करावेत. जिल्हा परिषद सदस्य रोहित , शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांचीही भाषणे झाली.या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने, महिला आरोग्य विभागाच्या सभापती राणी शेळके, बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, मीनाक्षी तावरे, रोहिणी तावरे, भारत गावडे आदी उपस्थित होते....पुनर्जन्म नसतो, हे सगळ बकवासजीवनात यशस्वी किंवा उद्ध्वस्त होण्यासाठी मित्रांची भूमिका कारणीभूत ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगले मित्र निवडावेत. वाईट गोष्टी, व्यसनांपासून दूर राहा. फिट राहावे. पुनर्जन्म नसतो, हे सगळे बकवास आहे. एकदा वर गेले की वरच. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळालेले आयुष्य चांगल्या पद्धतीने आरोग्यदायी जगावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस