शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नसेल तर दोष आपलाच : रवी परांजपे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 2:17 PM

सर्वसामान्यांपर्यंत अभिजातता पोहोचविण्याचा मार्ग आहे संस्कृती. पण हा मार्ग स्वीकारला का? याचे सकारात्मक उत्तर मिळत नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नसेल तर दोष आपलाच आहे.

पुणे : सर्वसामान्यांपर्यंत अभिजातता पोहोचविण्याचा मार्ग आहे संस्कृती. पण हा मार्ग स्वीकारला का? याचे सकारात्मक उत्तर मिळत नाही. मराठीलाअभिजात भाषेचा दर्जा मिळत नसेल तर दोष आपलाच आहे. अभिजातता केंद्र शासनाकडे मागून घ्यायची गोष्ट नाही. तो दर्जा आम्हालाच सिद्ध करण्याचीगरज आहे. मात्र ही परिस्थिती सध्यातरी दिसत नाही अशा शब्दातं ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी साहित्य संस्थांना टोला लगावला.महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळीअंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी 'रत्नाकर पारितोषिक'मौज दिवाळी अंकासाठी मोनिका गजेंद्रगडकर, रावसाहेब मोरमकर पारितोषिक 'ललित' या दिवाळी अंकासाठी अशोक कोठावळे,  'मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक' 'समदा' या दिवाळी अंकासाठी संपादिका मनस्विनी प्रभुणे, 'शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक' 'साहित्य शिवार' या दिवाळी अंकासाठी जयराम देसाई यांना देण्यात आले.  त्याच बरोबर डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट आॅनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक राम जगताप यांना , 'जानकीबाई केळकर' स्मृतिप्रीत्यर्थ 'उत्कृष्ट बालवाडमयदिवाळी अंकाचे पारितोषिक' वर्षा तोडमल  आणि दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे 'दि. अ. सोनटक्के पारितोषिक' 'अक्षर' मधील  'आवर्त' या कथेकरिता विजय खाडिलकर यांना प्रदान करण्यात आले तर उत्कृष्ट ललित लेखासाठीचे 'अनंत काणेकर पारितोषिक' 'शब्दशिवार' या दिवाळी अंकातील डॉ. रणधीर शिंदे यांच्या 'येडापीसा वारा चिकटलेला जन्मभर तुझ्या देहाला' या लेखाला देण्यात आले.यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार तसेच ज्योतिषतज्ञ चंद्रकांत शेवाळेआणि स्पर्धेचे समन्वयक वि.दा पिंगळे उपस्थित होते. परांजपे म्हणाले, ज्या उद्योगधंदयाच्या वाढीसाठी दिवाळी अंकांना जाहिराती मिळतात. त्यावरच आज गदा आली आहे. कलात्मक उद्यमशील अभिजातता उदयास आली असती तर वाचक वाढले असते पण ही कलात्मक अभिजातता वाढली आहे का नाही हे आपण पाहिलेच नाही. कोण म्हणत? आपले साहित्य अभिजात नाही. कमतरता आपल्यातच आहे.प्रा.मिलिंद जोशी म्हणाले, दिवाळी अंकांची संख्यात्मक वाढ होत असताना त्यांची वाङ्मयीन गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. अनेक दिवाळी अंकात तेचते लेखक वषार्नुवर्षे लिहित असल्यामुळे अंकांना साचलेपण आले आहे. अशा अंकांनी नव्या लेखकांचा शोध घेतला पाहिजे. दिवाळी अंकांना जाहिरातीच्यारूपाने आर्थिक मदत करणे हे समाजातील धनिकांना आपले सांस्कृतिक कर्तव्य वाटत होते. आज ती भावना राहिली नाही. वाचकांच्या अभिरुचीचा पोतबदलल्यामुळे त्यांना ललित साहित्याचा समावेश असलेल्या दिवाळी अंकांपेक्षा माहितीपर दिवाळी अंकांचे आकर्षण वाटते आहे. वाचनसंस्कृतीचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सवर््हेक्षण होण्याची गरज असल्याचे सांगितले.सत्काराला उत्तर देताना मनस्विनी प्रभुणे यांनी  जी लोक दिवाळी अंकांकडे केवळ पैसा कमवण्याच्या हेतूने न पाहाता वाचकांना दर्जेदार साहित्यवाचायला मिळावे यासाठी दिवाळी अंकांची निर्मिती करण्याची धडपड करीत असतात त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याची अपेक्षा  व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वि.दा पिंगळे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले तर प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.

टॅग्स :Puneपुणे