सुनील राऊत, पुणेराज्यशासनाने महापालिका हद्दीत नव्याने ३४ गावे घेण्याचा निर्णय घेतल्याने पुणे महापालिका राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरणार आहे. त्यामुळे शहरासाठी पाण्याची मागणीही वाढणार असून, या वाढीव हद्दीनंतर महापालिकेस तब्बल २० ते २१ टीएमसी पाणी लागणार आहे. या शिवाय राज्यशासनाच्या आदेशानुसार, महापालिका हद्दीजवळील ५ किलोमीटरपर्यंत पाणी पुरविणे महापालिकेस बंधनकारक असल्याने त्याचा भारही महापालिकेवर असणार आहे. त्यामुळे शहराच्या उशाला असणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमधील तब्बल ७० टक्के पाणी केवळ शहराच्या तसेच गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी राखून ठेवावे लागणार आहे.
...तर धरणं फक्त पुण्यासाठीच?
By admin | Updated: June 9, 2014 04:49 IST