शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आमचे हित ओळखून तरी सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी, पुण्यात कलाकारांचे आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 18:38 IST

सरकारने कलाकारांच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा...

ठळक मुद्देबालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ प्रातिनिधिक स्वरुपात आंदोलन

पुणे :  गेल्या दिवसांपासून आम्ही हाल सहन करत आहोत. दुसरे व्यवसाय आणि नोकऱ्याही करुन पाहिल्या. पण, त्याला यश मिळालेले नाही. आता आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणूनच आता पुरे.. सरकारने कलाकारांच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा.असे म्हणत ’मी कलाकार मला न्याय कधी’....’माझा काय गुन्हा’..’कलाकारांचे हित ओळखा’..  सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या...अशा आशयाचे फलक हातात घेवून बुधवारी कलाकारांनी सांस्कृतिक क्षेत्र लवकर सुरू करण्यासाठी सरकारला साद घातली. यावेळी कलाकारांचे प्रतिनिधित्व करत अभिनेते कुमार पाटोळे यांनी उपोषणाला सुरुवात केली. तसेच यावेळी बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ प्रातिनिधिक स्वरुपात आंदोलनही करण्यात आले.         कोरोनामुळे सहा महिने सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने कलाकार व तंत्रज्ञ यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे कला आणि सांस्कृतिक क्षेत्र सुरु करण्यास सरकारने परवानगी द्यावी, यासाठी कुमार पाटोळे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. पहिल्या दिवशी महा कलामंडलमधील कलाकारही यामध्ये सहभागी झाले. बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ प्रातिनिधिक स्वरुपात आंदोलनही करण्यात आले. यावेळी मंडलचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, मंदार जोशी, अशोकराव जाधव हे उपस्थित होते.       कलाकार चंद्रा पवार म्हणाले, ऑकेस्ट्रापासून ते लावणी कलाकारपर्यंत सर्वांकडे काम नाही. आम्ही कजबाजारी झालो आहोत. आता काय करावे हा प्रश्न पडला आहे. बचतही संपली आहे. त्यामुळे जगण्यासाठी जवळ काहीही शिल्लक नाही. आमच्या जगण्याला सांस्कतिक कार्यक्रम सुरु करुन सरकारने आधार द्यावा.     कलाकारांची सरकारकडे नोंदणी व्हावी, कलाकार म्हणून शासनाचे अधिकृत ओळखपत्र कलाकारांना द्यावे, कलाकारांचा आरोग्य विमा काढावा आणि शासनाकडून प्रत्येक कलाकाराला निवृत्तीवेतन मिळावे, अशा सरकारकडे आम्ही मागण्या केल्या असल्याचे मंडलचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.-----------

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या